CCTV Dainik Gomantak
गोवा

Goa Accident : वाढत्या रस्‍ते अपघातांवर आता ‘सीसीटीव्‍ही’चा उतारा

कारवाईसाठी सर्व रस्‍त्‍यांवर कॅमेरे जोडण्‍याचे लक्ष्‍य असल्याचं मंत्री मॉविन गुदिन्हो यांचं स्पष्टीकरण

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Accident : राज्यातील रस्ता अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आता पुढील दोन-तीन महिन्यांत सर्व रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय वाहतूक खात्याने घेतला आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांना लगाम बसेल. वेगमर्यादा, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचे क्रमांक सीसीटीव्हीत टिपून पोलिस व वाहतूक अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जाणार आहे, असे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.

पर्वरीत झालेल्या राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंत्री रोहन खंवटे, वाहतूक सचिव सुभाष चंद्रा, वाहतूक संचालक राजन सातार्डेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मंत्री माविन म्हणाले, राज्यातील सर्व रस्त्यांवर सीसीटीव्ही बसविण्याचे काम सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर हाती घेण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर हे कॅमेरे चोगम रस्त्यावर बसवण्यात येतील. यातून 24 तास वाहनचालकांवर नजर असेल. यामुळे चालकांवर नियमांचे पालन करण्याचे निर्बंध येतील व त्यामुळे रस्ता अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

सध्या ‘रेंट अ बाईक’च्या परवान्याचे नूतनीकरण करण्यात येईल. तसेच जे दुचाकी मालक सहचालकाला आयएसआय मार्कचे हेल्मेट त्यासोबत ठेवतील, त्यांनाच नव्याने परवाने देण्यात येतील, असेही माविन यांनी स्पष्ट केले.

नव्या कायद्याबाबत साशंकता

वाढते अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मद्यप्राशन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची घोषणा यापूर्वी वाहतूकमंत्र्यांनी केली होती. वाहन चालकाने मद्यालयात दारू पिऊ नये असे फलकही लावले गेले होते. दारू पिणाऱ्या चालकांना टॅक्सीने घरी पोहचवण्याची जबाबदारी मद्यालय मालकावर असेल व तशी तरतूद कायद्यात आणणार असल्याचे वाहतूकमंत्र्यांनी मत व्यक्त केले आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होणार का याबाबत साशंकता आहे. बारमालक ही जबाबदारी का स्वीकारतील, असाही प्रश्‍न उपस्थित होणार आहे.

साबांखावर नाराज

रस्त्यावर पडणारे खड्डे बुजवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांचे आहे. या खड्ड्यांमुळेही अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या खात्याचे अधिकारी याची गंभीरपणे दखल घेत नसल्याबद्दल मंत्री माविन यांनी खंत व्यक्त केली.

तर्र मद्यपींची जबाबदारी बारमालकांवर

1 मद्यालयात दारू पिणाऱ्या वाहनचालकाला सुरक्षितपणे घरी पोहोचवण्याची जबाबदारी त्या मद्यालय मालकाची असेल. यासंदर्भातचा कायदा लवकरच लागू करण्याची चर्चा करण्यात येणार आहे.

2 दारू पिऊन वाहन चालविणे गुन्हा आहे. मात्र, ग्राहकांना टॅक्सीमधून घरी पोहचवण्याची जबाबदारी बारमालकांवर राहणार आहे. नव्या कायद्यानुसार दंड, शिक्षेची काटेकोरपणे पालन केले जाईल.

3 मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांना आळा घालण्यासाठी रात्रीच्या वेळी महत्त्वाच्या ठिकाणी थांबण्याऐवजी बार व पबच्या बाहेर आल्यानंतर वाहन चालकांची तपासणी केली जाईल.

...तर ओला, उबेर नको

राज्यातील सर्व टॅक्सी ऑपरेटर्सनी टॅक्सी ॲपकडे वळावे. ‘गोवा माईल्स ॲप’ चांगल्याप्रकारे सक्रिय असल्याने ओला-उबर या कॅब ॲग्रेगटर्सची गोव्याला गरज नाही. टॅक्सी चालकांची मक्तेदारी संपली आहे. मी कठोर निर्णय निर्णय घेत आहे. तरी मला माझ्या सुरक्षिततेची काळजी नाही. मला काहींचे फोन आले तरी त्या माफियांचा सामना करण्याची हिंमत माझ्यात आहे. गोव्याच्या हितासाठीच आहे, ते मी करीन, असं वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी स्पष्ट केलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT