Goa News | Mauvin Godinho Dainik Gomantak
गोवा

Goa News: कर न भरणाऱ्यांना दाखले देऊ नका- पंचायतमंत्री

Goa News: घरपट्टी, व्यापारी कर ज्यांनी ग्रामपंचायतींमध्ये भरलेला नाही, त्यांना कोणतेही दाखले द्यायचे नाही, असे सरकारने ठरविले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: घरपट्टी, व्यापारी तसेच प्रकारचा कर ज्यांनी ग्रामपंचायतींमध्ये भरलेला नाही, त्यांना कोणतेही दाखले द्यावयाचे नाही, असे सरकारने ठरविले आहे. राज्‍यातील 191 पंचायतींची करापोटी किती वसुली बाकी आहे, ते शोधण्याचे काम पंचायत खात्याने सुरू केले आहे.

मात्र कोणत्‍याही परिस्‍थितीत कर न भरणाऱ्यांना कोणताही दाखला देऊ नका, असे स्‍पष्‍ट निर्देश पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी पंचायतीना दिले आहेत. बोगमाळो-चिकोळणा पंचायतीला नुकतीच भेट देऊन गुदिन्‍हो यांनी सरपंच संकल्प महाले, उपसरपंच लोरिना डिकुन्हा व इतर पंचांशी चर्चा केली. तसेच तेथील आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला.

दक्षिण गोवा पंचायत महिला सशक्तीकरण अभियान आणि पॅरिश कौन्सिल ऑफ बोगमाळो यांच्या वतीने आयोजित मोफत नेत्रतपासणी शिबिरात त्यांनी गरजूंना चष्म्यांचे वाटप केले. ज्यांनी पंचायतीचे कर थकविले आहेत, त्यांना शुल्क भरायला सांगा आणि नंतरच दाखले द्या, असा कानमंत्र गुदिन्हो यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT