Subhash Faldesai
Subhash Faldesai Dainik Gomantak
गोवा

Subhash PhalDessai: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छतेद्वारे समुद्र देवतेला केले नमन

दैनिक गोमन्तक

वास्को: स्वच्छतेला प्रथम प्राधान्य देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाला स्वच्छतेचे महत्व पटवून दिले आहे. देशातील समुद्राचे रक्षण करताना मोदीजींनी सर्व समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छतेची मोहीम राबवून एका प्रकारे समुद्र देवतेला नमन केले असल्याची माहिती राज्य समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.

(Goa Government observed coastal cleanup day at 5 beach)

आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारी स्वच्छता दिन राज्य सरकारतर्फे 'स्वच्छ सागर सुरक्षित सागर' अंतर्गत मुरगाव तालुक्यातील वास्को, बायणा, दाबोळी, वेलसाव समुद्र किनारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी वास्को बायणा समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण मंत्री सुभाष परदेसाई उपस्थित होते. त्याच्या समवेत मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, मुरगाव नगरपालिकेचे उपानगराध्यक्ष अमय चोपडेकर, गोवा साधन सुविधा विकास मंडळाचे उपाध्यक्ष दीपक नाईक, रवींद्र भवन अध्यक्ष जयंत जाधव.

नगरसेवक फेड्रीक हेंन्रिक्स, नारायण बोरकर, यतीन कामुर्लेकर, गिरीश बोरकर, दामू नाईक, नगरसेविका शमी साळकर, नगरसेविका श्रद्धा आमोणकर, देविता आरोलकर, श्रद्धा शेट्ये, मंजुषा पिळर्णकर, माजी उपनगराध्यक्षा रिमा सोनुर्लेकर, माजी नगरसेविका रोचना बोरकर, पालिकेचे अभियंता आगुस्तीन मिस्किता, सेनेटरी निरिक्षक महेश कुडाळकर, कनिष्ठ अभियंता विपुल म्हार्दोळकर, मच्छिंद्र मांद्रेकर व इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच मुरगाव सडा येथील दीप विहार उच्च माध्यमिक विद्यालय, वास्को सेंट अँड्रू उच्च माध्यमिक वाडेनगर, उच्च माध्यमिक विद्यालय बायणा, सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.

बोगमाळो समुद्रकिनारी पंचायत मंत्री मावीन गुदिन्हो यांनी समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात, बोगमाळोचे सरपंच संकल्प महाले, उपसरपंच लॉरेना न्डीकून्हा, पंच ऐश्वर्या थोरात, समाज कार्यकर्ते ब्रह्मानंद पवार व इतर मान्यवर उपस्थित होते. कुठ्ठाळी वेलसाव समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहिमेत कला व सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे, कुठाळीचे आमदार आतोनियो वास व इतर मान्यवर उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

‘या’ देशाच्या माजी मंत्र्याच्या पत्नीची निर्घृण हत्या, खळबळजनक खुलासा; व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Supreme Court: राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या सदस्यांना कोर्टाने फटकारले; आदेशाच्या उल्लंघनबाबत बजावली अवमानाची नोटीस

SCROLL FOR NEXT