MLA Carlos Ferreira गोवा सरकारने 2017 पासून यावर्षापर्यंत महालेखा परीक्षक प्रमाणपत्र केंद्र सरकारला सादर न केल्याने राज्याला आंतरराज्य जीएसटीचा महसूल मिळत नाही. हा गोवा सरकारकडून हलगर्जीपणा असून यामुळे गोव्याला मिळणारे हजारो करोडचा निधी केंद्राकडून मिळालेला नाही अशी माहिती ऍड. कार्लोस फेरेरा यांनी दिलीय.
पत्रकार परिषदेत आमदार ऍड. कार्लोस फेरेरा म्हणाले की 2017 पासून ते आत्तापर्यंत केंद्राकडून मिळणारा आयजीएसटी आंतरराज्य जीएसटीचा हजार कोटी रुपयांचा महसूल मिळणे बंद झाला असून अशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सभागृहात कबूली दिल्याचे काँग्रेस आमदार कार्लस फेरेरा यांनी सांगितले.
या प्रकाराविषयी मुख्यमंत्र्यांनी ज्या अधिकारी लोकांनी हलगर्जीपणा करून राज्याला मिळू शकणारा जीएसटीचा महसूल बुडवला आहे त्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करणे आवश्यक असल्याचे फेरेरा म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.