Goa Government | Taxi Dainik Gomantak
गोवा

Goa Government: गोव्यात डिसेंबरपर्यंत स्वत:चे 'गोवा टॅक्सी' ॲप

Goa Government: 'गोवा टॅक्सी' नावाचे ॲप असून ते डिसेंबरपर्यंत सुरु होणार आहे, अशी माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa: ॲप आधारित टॅक्सी सेवा विषयावरून सरकार आणि स्थानिक टॅक्सीचालक यांच्यात संघर्ष अटळ असल्याचे दिसत असतानाच यावर तोडगा म्हणून सरकार नवीन ॲप घेऊन येणार आहे. ‘गोवा टॅक्सी’ नावाचे ॲप असून ते डिसेंबरपर्यंत सुरू होणार आहे, अशी माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, माविन गुदिन्हो आणि पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांची आज मुख्यमंत्र्यांच्या आल्तिनो येथील निवासस्थानी बैठक झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. गोव्यातील वाहतूक व्यवस्था सुलभ करण्यासाठी ॲप आधारित टॅक्सी सेवा आवश्‍यक आहे. राज्यात ओला आणि उबर सेवा आणण्याचा विचार सरकारकडून झाला होता.

नागरिकांनी त्याचे स्वागतही केले होते; परंतु त्यांच्या काही समस्या समोर आल्या असून कर्नाटकात त्यांची सेवा बंद केली आहे. त्यांच्यावर मोठे कर्ज असल्याने भारतातील सेवा ते बंद करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही स्वत:चा ॲप तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडवर ही जबाबदारी सोपवली जाणार असून, विविध घटकांच्या सूचनांनुसार हे ॲप तयार केले जाणार आहे, असे गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.

या ॲपमध्ये स्थानिक टॅक्सीचालकांना संधी मिळणार असून त्यांनी याचा लाभ घेतला पाहिजे. या ॲपसाठी निधीही राज्य सरकारकडून दिला जाईल. या आधुनिक युगात गोमंतकीयांना स्वस्त आणि सुलभ वाहतूक साधन हवी आहे.

बऱ्याच काळापासून ॲप आधारित वाहतूक सेवेसाठी मागणी होत होती. काळासोबत चालणे आवश्‍यक आहे. जर या क्षणी अशा सुविधांचे महत्त्व त्यांना समजले नाही तर राज्य मागे पडेल. गोव्यातील टॅक्सीचालक जास्त शुल्क आकारतात अशा तक्रारी वारंवार येतात. यामुळे राज्याची छबी खराब होते, अशी चिंता गुदिन्हो यांनी व्यक्त केली.

माविन गुदिन्हो, वाहतूकमंत्री-

गोवा माईल्स ही ॲप आधारित टॅक्सी सेवा पूर्वीपासून सुरू असून याचा चांगला अनुभव पर्यटक तसेच स्थानिकांना देखील आला आहे. आता गोवा टॅक्सी ॲपचा लाभ सगळ्यांनाच मिळेल.

रोहन खंवटे, माहिती-तंत्रज्ञान मंत्री-

आज मुख्यमंत्री सावंत आणि गुदिन्हो यांच्यासोबत बैठक झाली. पर्यटन खात्यामार्फत हे ॲप चालणार असून आधुनिक काळात नागरिकांना मोबाईलवर सेवा उपलब्ध आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT