Goa Mine Project | Puti Gaonkar Dainik Gomantak
गोवा

Goa Mine Project: खाण कामगारांचे हित सरकारने जपावे- पुती गावकर

Goa Mine Project: सरकारने खाणी सुरु केल्या तरी कामगारांच्या रोजगाराला धक्का लागता कामा नये, असे स्पष्ट मत गावकरांनी व्यक्त केले.

दैनिक गोमन्तक

Goa Mine Project: राज्यातील खनिज खाणी सुरु होत असतील, तर त्याचे कामगारांकडून स्वागतच करण्यात येत आहे. मात्र, या खाणींवर जे कामगार कामावर आहेत, त्यांच्या रोजगाराला कोणताच धक्का लागता कामा नये. या कामगारांना आहे त्याच खाण कंपन्यांत पुन्हा कामावर घेणे आवश्‍यक असून तशी कामगार संघटनेची मागणी आहे.

त्यामुळे सरकारने लिलाव करून जरी खाणी सुरू केल्या तरी आधीच्या कामगारांचे हित जपावे, असे स्पष्ट मत कामगार नेते पुती गावकर यांनी व्यक्त केले. फोंड्यात काल बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पुती गावकर यांनी खाण कामगारांची व्यथा मांडली.

गोवा डेअरीच्या अनागोंदी कारभारावर बोट ठेवताना पुती गावकर यांनी कामगार जादा झाले म्हणून कामगारांना काढून टाकणे गैर असून जे कामगार गेली सात दे दहा वर्षे गोवा डेअरीत कामाला आहेत, त्यांना कामावरून काढून टाकणे म्हणजे कामगारहिताच्या विरुद्ध संचालकांचे वर्तन आहे.

गोवा डेअरीत उत्पादन विभागात असलेल्या कामगारांची सातत्याने आवश्‍यकता आहे. येथील कामगार निवृत्त झाल्यामुळेच या लोकांना घेण्यात आले. मात्र, आता बत्तीस कामगारांना काढून टाकण्याचे षड्‌यंत्र सुरु असून असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असे पुती गावकर यांनी सांगितले.

किमान वेतन लागू करावे

खाण कामगारांचे हित जपताना त्यांना त्यांची रोजीरोटी व्यवस्थित मिळाली पाहिजे. गोव्यात येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांमुळे येथील राहणीमान महागडे झाले असून त्याची झळ गोमंतकीयांना बसत आहे.

त्यातुलनेत एखाद्या आस्थापनात कामाला असलेल्या गोमंतकीय कामगाराला किमान वेतन मिळत नाही, त्यासाठी विद्यमान कामगारमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी जाहीर केल्याप्रमाणे कामगारांचे हित जपताना त्यांना किमान वेतन लागू करावे, असे पुती गावकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT