Goa News | Subhash Phaldesai Dainik Gomantak
गोवा

Goa News: मंत्रीचं अंधारात, परिवहन खातं Active मोडमध्ये!

Goa News: नदी परिवहन खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई स्वतः आपल्याच खात्याविरुद्ध नाराज झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa News: नदी परिवहन खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई स्वतः आपल्याच खात्याविरुद्ध नाराज झाले आहेत. कारण त्यांच्याकडे असणाऱ्या नदी परिवहन खात्यातर्फे येत्या 13 तारखेला सौर ऊर्जेवरील फेरीबोटीचे उद्‍घाटन होणार आहे.

दरम्यान, या कार्यक्रमाला नदी परिवहन खात्याने त्यांना याविषयी काहीच कल्पना दिली नाही, शिवाय त्यांना पाहुणे म्हणून निमंत्रित केले आहे. यावरून मंत्री फळदेसाई यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राज्यातील फेरीबोट सेवेचे काही तक्रारी आपल्यास आपल्याकडे येतात आपल्याला त्याची जबाबदारी घ्यावी लागते. परंतु नव्याने सुरू होणाऱ्या फेरीबोट सेवेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाविषयी आपल्याबरोबर चर्चाही केली जात नाही, अशी उद्विग्नता मंत्री फळदेसाई यांनी व्यक्त केली.

मंत्रालयात समाजकल्याण खात्याच्या कार्यक्रमाच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांना सौर ऊर्जा फेरीबोट सेवा केव्हा सुरू होणार याविषयी विचारणा करण्यात आली, तेव्हा त्यावर ते बोलत होते. आपणास पाहुणे म्हणून खात्याने सौर ऊर्जा फेरीबोटीच्या उद्घाटनास बोलविण्यात आले आहे. आपल्याशी या कार्यक्रमाविषयी अजिबात विश्‍वासार्हता घेण्यात आले नाही किंवा चर्चाही झालेली नाही.

मंत्री फळदेसाई हे रोखठोक बोलणारे आहेत, जे स्पष्ट आहे ते आहे. आपल्याकडील खात्याकडून काही झाले तर आपणास त्याचा जाब विचारला जातो असे त्यांचे म्हणणे रास्तच आहे. बंदर कप्तान खात्याचा कॅप्टन हे प्रमुख असले तरी या खात्यातर्फे ज्या फेरीबोट सेवा किंवा इतर जलमार्गातील कार्याविषयी विचारले जाते, त्यावर खाते प्रमुख म्हणून मंत्र्यास उत्तर द्यावे लागते.

कॅप्टन ऑफ पोर्ट्‍स मागील सरकारच्या काळात मायकल लोबो यांच्या काळात होते, परंतु मायकल लोबो काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्या खात्याचा भार इतर कोणत्याही मंत्र्याकडे दिला गेला नव्हता. नव्याने सत्तेवर आलेल्या सरकारात कॅप्टन ऑफ पोर्ट्स कोणाकडे दिलेले नाही, त्यामुळे त्याचा भार सर्वस्वी कॅप्टनच्याकडेच राहिला आहे.

बंदर कप्तान खात्याच्या कारभामुळे मंत्री दुखावले!

राज्य सरकारच्या बंदर कप्तान खात्यातर्फे दिवाडीच्या ॲक्वारियस शिपयार्डमध्ये सौर ऊर्जा फेरीबोटीची बांधणी झालेली आहे. या बोटीसाठी राज्य सरकारने 3.97 कोटी रुपये खर्च केला आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे न्यू मंगलोर पोर्ट ॲथोरिटी आणि मुरगाव पोर्ट ट्रस्टच्यावतीने मुरगाव पोर्ट ट्रस्टच्या ठिकाणी क्रूझ टर्मिनलचा शिलाण्यास व न्यू मंगलोर पोर्ट ॲथोरिटीच्या कचरा व्यवस्थापन पर्कल्प व इतर कार्यक्रम 13 तारखेला होणार आहेत.

तसेच, या कार्यक्रमात फ्लोटिंग जेटी व सौर ऊर्जा फेरीबोटीचे लोकार्पण होणार आहे. खरेतर केंद्र सरकारच्या अखत्यारीत मुरगाव पोर्ट ट्रस्ट येते. त्यामुळे त्याठिकाणी राज्य सरकारने बांधलेल्या सौर ऊर्जा फेरीबोटीचा लोकार्पण सोहळा वेगळा होणे अपेक्षीत होते. कदाचित यावरूनच मंत्री फळदेसाई यांचे मन दुखावलेले दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CM प्रमोद सावंतांविरोधात बदनामीकारक व्हिडिओ करणाऱ्या गौरव बक्शीला 50,000 दंड; कोर्टासमोर मागितली माफी

'माझे पोलीस स्टेटमेंट माध्यमांमध्ये कसे लीक झाले'? रामा यांच्या पत्नीची पणजी पोलीस निरीक्षकाविरुद्ध तक्रार

Goa Politics: 'आप'च्या राजकारणाची स्क्रिप्ट उघड! "छुपे साटेलोटे नेत्यांच्या राजीनाम्याला कारणीभूत", काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आक्रमक

Watch Video: "लड़कियों के हाथों में मजा बहुत है, वो...", पाकिस्तान महिला संघाच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचं वादग्रस्त विधान Viral

Yashasvi Jaiswal: शुभमन गिलनंतर आता यशस्वी जैस्वालचाही 'कॅप्टन'पदावर डोळा; म्हणाला, "मला पण कर्णधार बनायचयं!"

SCROLL FOR NEXT