Goa Zilla Panchayat Election: कुठ्ठाळी मतदारसंघात गाजतोय; विकासकामांचा मुद्दा!

Goa Zilla Panchayat Election: विकासकामे करणार असल्याचे काँग्रेसच्या वॅलेन्ट बार्बोझा यांनी सांगितले आहे.
Goa Zilla Panchayat Election | Cortalim Panchayat
Goa Zilla Panchayat Election | Cortalim PanchayatDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Zilla Panchayat Election: कुठ्ठाळी मतदारसंघात भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार मार्सेलिना वाझ आणि काँग्रेसच्या वॅलेन्ट बार्बोझा यांच्यात खरी लढत होणार, असे मानले जात आहे. या दोघांनीही प्रचारादरम्यान विकासकामे करणार असल्याचा दावा मतदारांशी केला आहे.

आपण नको असलेल्या प्रकल्पाला विरोध करूत असे बार्बोझा यांनी जाहीर केले आहे. तर मार्सेलिना वाझ यांनी आपल्या पतीने दिलेले आश्‍वासने आपण पूर्ण करणार, असा विश्‍वास व्यक्त केला आहे.

Goa Zilla Panchayat Election | Cortalim Panchayat
Madgaon Mayor Election : तिढा सुटणार; दामोदर शिरोडकर होणार मडगावचे नवे नगराध्यक्ष

कुठ्ठाळी मतदारसंघातून जिल्हा पंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी कुठ्ठाळीचे आमदार अँथोनी वाझ यांच्या पत्नी मार्सेलिना वाझ यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसतर्फे वॅलेन्ट बार्बोझा, आपतर्फे जॉन डिसा, तर आरजीतर्फे लेस्लि गामा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे.

तसेच, या मतदारसंघातून निवडून आलेले अँथोनी वाझ हे आता आमदार झाल्याने या मतदारसंघातील जिल्हा पंचायत सदस्याची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. मार्सेलिना वाझ यांनी आपल्याला लोकांनी केलेल्या विनंतीमुळे तसेच पती अँथोनी वाझ यांची कामे पुढे नेण्यासाठी आपण निवडणूक लढवित असल्याचे सांगितले.

Goa Zilla Panchayat Election | Cortalim Panchayat
Goa Accident : वाढत्या रस्‍ते अपघातांवर आता ‘सीसीटीव्‍ही’चा उतारा

अँथोनी वाझ हे अपक्ष आमदार आहेत. आपणच भुषवलेल्या जिल्हा पंचायत सदस्यपदावर आपल्या पत्नीला निवडून आणण्याचा प्रयत्न ते आता करणार आहेत. भाजपाने आपला अधिकृत उमेदवार या पोटनिवडणुकीसाठी ठेवलेला नाही.

मेर्सियांना वास यांनी यापूर्वी कुठ्ठाळी पंचायत उपसरपंच म्हणून कार्य केलेले असून त्या अनुभवी आहेत. जिल्हा पंचायत पातळीवरील आपली काही अपूर्ण राहिलेली कामे त्या पूर्ण करतील असा विश्वास आमदार वास यांनी व्यक्त केला आहे.

Goa Zilla Panchayat Election | Cortalim Panchayat
Goa Municipality: नगरपालिकेच्या भर सभामंडपात नीलेश काब्रालांनी घेतले अधिकाऱ्यांना फैलावर

जाहीरनाम्यातील कामे पूर्ण करण्याचे आश्‍वासन

अँथोनी वाझ यांनी जि.पं. सदस्य असताना बरीच कामे केली आहेत. आमदार झाल्यावर जिल्हा पंचायत सदस्याचा त्यांनी राजीनामा दिल्याने जाहीरनाम्यामध्ये दिलेली काही कामे अद्याप झालेली नाहीत. ती पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मी उपसरपंच पद भूषविले असल्याने मला सामाजिक कामाचा अनुभव आहे, असे अपक्ष उमेदवार मार्सेलिना वाझ यांनी सांगितले.

नको असलेल्या प्रकल्पाला विरोध

कुठ्ठाळी मतदारसंघातील रहिवाशांना रेल्वे दुपदरीकरण, कोळसा, हॉटेल प्रकल्प नको आहेत. या प्रकल्पामुळे पर्यावरण नष्ट होण्याची भीती त्यांच्या मनात आहे. त्यामुळे त्यांनी मला उभे केले आहे. त्यांना नको असलेल्या प्रकल्पाला माझाही विरोध असेल.

Goa Zilla Panchayat Election | Cortalim Panchayat
Goa Government: गोव्यातील प्रत्येक तालुक्यात उभारणार 'महसूल भवन'

तसेच, या भागात विकासकामे करणार असल्याचेही काँग्रेसच्या वॅलेन्ट बार्बोझा यांनी सांगितले. आरजीचा उमेदवार फक्त मते फोडण्यासाठी उभा करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com