Goa Film Shooting Dainik Gomantak
गोवा

Goa Film Shooting: फिल्म इंडस्ट्रीला सावंत सरकारचं 'गिफ्ट', गोव्यातील शूटिंगसाठी आता सिंगल-विंडो सिस्टिम; वेळ आणि पैशाची होणार बचत

Goa Government On Film Shooting: आता राज्य सरकार एक ऑनलाइन सुविधा पोर्टल सुरु करत आहे. या ‘सिंगल-विंडो’ प्रणालीद्वारे चित्रपट शूटिंगसाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या मिळवणे सोपे होणार आहे.

Manish Jadhav

Goa Government On Film Shooting: गोवा हे केवळ पर्यटकांनाच नाही, तर चित्रपट निर्मात्यांनाही नेहमीच आकर्षित करत आले आहे. ‘बॉबी’, ‘दिल चाहता है’ आणि ‘जोश’ सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये गोव्याचे सुंदर लोकेशन्स पाहायला मिळतात. चित्रपटांचे चित्रीकरण करताना निर्मात्यांचा नेहमीच प्रयत्न असतो की, निदान एक तरी सीन गोव्याचा असावा. मात्र, त्यासाठी त्यांना अनेक सरकारी परवानग्या आणि प्रक्रियांमधून जावे लागते. पण आता गोवा सरकारने ही प्रक्रिया सोपी आणि ऑनलाइन बनवली आहे.

ऑनलाइन पोर्टलवर अर्ज

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता राज्य सरकार एक ऑनलाइन सुविधा पोर्टल सुरु करत आहे. या ‘सिंगल-विंडो’ प्रणालीद्वारे चित्रपट शूटिंगसाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या मिळवणे सोपे होणार आहे. निर्मात्यांचे काम सोपे करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ही नवीन सुविधा गोव्याच्या (Goa) नोडल एजन्सी एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ESG) ने सुरु केली आहे.

एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ESG) च्या उपाध्यक्ष दिलायला लोबो यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, “आम्ही फिल्म सुविधा पोर्टल (Film Facilitation Portal) आधीच सुरु केले आहे. ही एक ऑनलाइन सुविधा आहे, जिथे गोव्यात चित्रपट शूटिंगशी संबंधित सर्व परवानग्यांसाठी अर्ज करता येऊ शकतो. गोव्यात शूटिंग करण्यास इच्छुक कोणताही व्यक्ती या सिंगल-विंडो प्रणालीचा वापर करु शकतो, जी पूर्णपणे पारदर्शक असेल.”

त्यांनी पुढे सांगितले की, “1 सप्टेंबरपासून हे पोर्टल सर्वांसाठी ऑनलाइन खुले केले जाईल. ज्यांना या पोर्टलबद्दल अधिक माहिती हवी आहे, ते आमच्या www.esg.co.in या वेबसाइटला भेट देऊ शकतात.”

शूटिंग वाढण्याची शक्यता

दरम्यान, या नवीन प्रणालीमुळे गोव्यात चित्रपटांचे शूटिंग वाढण्याची शक्यता आहे. बोरकर ज्यांच्या टीमने ‘दिल चाहता है’, ‘हनीमून ट्रॅव्हल्स’, ‘फाइंडिंग फॅनी’ आणि अनेक दक्षिण भारतीय ब्लॉकबस्टर चित्रपटांवर काम केले, त्यांचे मत आहे की सिंगल-विंडो क्लिअरन्समुळे गोव्यात आणखी जास्त प्रोजेक्ट्स येऊ शकतात. हा निर्णय चित्रपट उद्योगासाठी खूप महत्त्वाचा आहे. यापूर्वी, वेगवेगळ्या सरकारी विभागांकडून परवानगी घेण्यासाठी निर्मात्यांना खूप वेळ आणि पैसा खर्च करावा लागत होता. आता एकाच ठिकाणी सर्व परवानग्या मिळाल्याने त्यांचा वेळ वाचेल. या निर्णयामुळे गोव्यातील स्थानिक कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर लोकांनाही कामाची संधी मिळेल, ज्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही (Economy) फायदा होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arun Gawli: गँगस्टर अरुण गवळीला दिलासा! शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

रानडुकरांसाठी लावलेल्या तारेचा शॉक लागला; गणपती घरी आले त्याच दिवशी सख्या भावांचा मृत्यू झाला Video

बाईक व्यवस्थित लावण्यास सांगितले म्हणून पे – पार्किंग कर्मचाऱ्यांवर 5 जणांकडून सुरी हल्ला, गणेश चतुर्थीला म्हापशात घडली घटना

Viral Video: दोन सांडांच्या भांडणात निष्पाप मुलीचा अपघात, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, “टार्गेट पूर्ण!”

Mohammed Shami: ‘मी क्रिकेट सोडून देईन!’… मोहम्मद शमी जेव्हा निवृत्ती घेणार होता, भरत अरुण यांचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT