Goa vacant government posts Dainik Gomantak
गोवा

Goa OBC Quota: सरकारी खात्यांमधील ओबीसी कोटा भरणार कधी? विविध खात्यांमधील 549 पदे रिक्त

Goa OBC Government Jobs: : गोव्यातील विविध खात्यांमध्ये राखीव असलेल्या गटांचा पूर्ण कोटा भरला जात नसल्याचे दिसून येत आहे. राज्यातील विविध खात्यांत इतर मागासवर्गाचा (ओबीसी) कोटाही भरला जात नाही.

Sameer Panditrao

पणजी: गोव्यातील विविध खात्यांमध्ये राखीव असलेल्या गटांचा पूर्ण कोटा भरला जात नसल्याचे दिसून येत आहे. राज्यातील विविध खात्यांत इतर मागासवर्गाचा (ओबीसी) कोटाही भरला जात नाही. अजूनही विविध खात्यांमधील ओबीसींसाठी राखीव असलेली ५४९ पदे रिक्त आहेत. त्यामुळे आता ही पदे कधी भरणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज्य सरकारच्या विविध खात्यांमधील ओबीसींसाठी रिक्त असलेली पदे विविध कारणांमुळे भरली गेली नसल्याचे दिसत आहेत. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, समाजकल्याण खात्याच्या मंत्र्यांनीच लेखी उत्तरातून ही माहिती दिली आहे.

यावरून कदंब परिवहन महामंडळात सर्वाधिक २११ पदे रिक्त आहेत. त्यात १४ निरीक्षकांचाही समावेश आहे. याशिवाय जलस्रोत खात्यात ४५ पदे रिक्त आहेत. पशुसंवर्धन खात्यात ४३ आणि आर्थिक विकास महामंडळात (ईडीसी) २७, कृषी खात्यात २५, बंदर कप्तान खात्यात २४ पदे रिक्त आहेत.

याशिवाय भूमी अभिलेख खात्यात ११, तर गोवा विद्यापीठांमध्ये १८ पदे रिक्त आहेत. राजभाषा संचालनालयात ११ पदे रिक्त आहेत, महिला व बालकल्याण खात्यात १० आणि तंज्ञशिक्षण विभागात ९ पदे रिक्त आहेत.

त्याचबरोबर अन्न व औषध प्रशासन विभागात ९, हस्तकला महामंडळात ८, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात १०, गोवा शालांत मंडळात ८ आणि विशेष बाब म्हणजे आयटी खात्यात ७ पदे रिक्त आहेत. कौशल्य विकास खात्यात ८७ आणि आयपीएचबीमध्ये ओबीसींसाठी राखीव असलेल्या १२४ पदांपैकी १०९ पदे भरली असून, १५ पदे अजूनही रिक्त आहेत. ही पदे भरल्यावर जनतेच्या कामांचा निपटारा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

अप्रेंटीसशीप पूर्ण करण्यावर भर

एका बाजूला राज्य सरकार उमेदवारांची अप्रेंटीसशीप पूर्ण करण्यावर भर देत आहे. त्यामुळे अप्रेंटीसशीप पूर्ण करणाऱ्या ओबीसी गटातील युवकांना या रिक्त जागांवर नियुक्त केले जाणे अपेक्षित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

Vishwajit Rane: ..तर वेगळा 'गोवा' पाहायला मिळेल! आरोग्यमंत्री राणेंचे स्वच्छता अभियान; पणजी बसस्‍थानकावर केली साफसफाई

Goa Rain: सांगितला पाऊस, पडले 'कडकडीत' ऊन! ‘यलो अलर्ट’ घेतला मागे; 4 दिवस मध्यम पावसाची शक्यता

Goa Live Updates: मंत्री रवी नाईक यांना कोडारवासियांचे IIT विरोधात निवेदन

Ramen Health Risks: नूडल्स वाढवतात अकाली मृत्यूचा धोका? जपान विद्यापीठांच्या नव्या अभ्यासात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT