Goa Public Service Commission  Dainik Gomantak
गोवा

Job Vacancy: गोव्यात सरकारी नोकरीची संधी; जीपीएससी मार्फत 3 विभांगात 37 जागांसाठी भरती

सार्वजनिक आरोग्य विभाग, कृषी विभाग, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागात पदांसाठी भरती केली जाणार आहे

Rajat Sawant

Goa Public Service Commission Recruiting For The Posts: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या गोयकारांसाठी ही एक महत्वाची बातमी आहे. गोवा लोकसेवा आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार (Goa Public Service Commission Recruitment 2023) सार्वजनिक आरोग्य विभाग, कृषी विभाग, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागात पदांसाठी भरती केली जाणार आहे.

ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे ते गोवा लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया खाली तपशीलवार दिली आहे.

इच्छुक उमेदवारांनी गोवा लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. http://gpsc.goa.gov.in/ या संकेत स्थळावर जावून आपण अर्ज दाखल करू शकता.

सार्वजनिक आरोग्य विभाग

गोवा मेडिकल कॉलेज अंतर्गत प्रतिनियुक्तीवर बदली पदांत

1. असोसिएट प्रोफेसर या पदासाठी 9 विभागांमध्ये 14 जागा रिक्त आहेत. या पदांसाठी वेतन श्रेणी 11 नुसार वेतन देण्यात येणार आहे.

2. प्राध्यापक या पदासाठी 10 विभागांमध्ये 10 जागा रिक्त आहेत. या पदांसाठी वेतन श्रेणी 13 नुसार वेतन देण्यात येणार आहे.

गोवा मेडिकल कॉलेज अंतर्गत थेट भरतीद्वारे पदे

1. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी 2 विभागांमध्ये 3 जागा रिक्त आहेत. या पदांसाठी वेतन 15,600हजार ते 39,100 +6,600 रुपये देण्यात येणार आहे. यासाठी वयोमर्यादा 45 वर्षांपेक्षा जास्त नाही.

2. जेरियाट्रिक्स मेडिसिनमधील सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी 1 जागा रिक्त आहे. या पदासाठी वेतन 15,600 ते 39,100+6,600 रुपये देण्यात येणार आहे. यासाठी वयोमर्यादा 45 वर्षांपेक्षा जास्त नाही.

3. बालरोग शस्त्रक्रिया लेक्चरर या पदासाठी 1 जागा रिक्त आहे. या पदासाठी वेतन 15,600 ते 39,100+6,600 रुपये देण्यात येणार आहे. यासाठी वयोमर्यादा 45 वर्षांपेक्षा जास्त नाही.

गोवा डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल

लेक्चरर या पदासाठी दोन विभागांमध्ये 3 जागा रिक्त आहेत. यातील 2 जागा एसटी आणि ओबीसी साठी आरक्षित आहेत. या पदासाठी वेतन 15,600 ते 39,100+6,600 रुपये देण्यात येणार आहे. यासाठी वयोमर्यादा 45 वर्षांपेक्षा जास्त नाही.

कृषी विभाग

सहाय्यक कृषी अधिकारी या पदासाठी 3 जागा रिक्त आहेत. यातील एक जागा एससीसाठी आरक्षित आहे. या पदासाठी वेतन 9,300हजार ते 34,800+4,200 रुपये देण्यात येणार आहे. यासाठी वयोमर्यादा 45 वर्षांपेक्षा जास्त नाही.

या पदासाठी शैक्षणिक पात्रता - भारतीय कृषी संशोधन परिषदेने मान्यता दिलेल्या कृषी विद्यापीठातून कृषी, फलोत्पादन विषयातील बॅचलर पदवी

कौशल्य विकास व उद्योजकता विभाग

प्रिन्सिपल ज्युनियर स्केल/सहायक अप्रेंटिसशिप सल्लागार/ सहाय्यक परीक्षा नियंत्रक या पदासाठी 2 जागा रिक्त आहेत. या पदासाठी वेतन 9,300 हजार ते 34,800+4,800 रुपये देण्यात येणार आहे.

या पदासाठी शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी. 5 वर्षांचा व्यावहारिक अनुभव, त्यापैकी 2 वर्षे प्रशासन किंवा मानव संसाधन व्यवस्थापनात असणे आवश्यक आहे.

वरील सर्व पदांसाठी कोंकणी, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

(या भरतीबाबत अधिक सविस्तर माहितीसाठी गोवा लोकसेवा आयोगाच्या http://gpsc.goa.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT