Morlem News : मोर्ले बागवाडावासीयांच्या मागणीला अखेर यश; 13 कोटी खर्चून सरकार उभारणार नवा पूल

या पुलाचा फायदा सुमारे 3 हजार नागरिकांना होणार
New Bridge Will Be Constructed At Morlem Bagwada
New Bridge Will Be Constructed At Morlem BagwadaDainik Gomantak
Published on
Updated on

New Bridge Will Be Constructed At Morlem Bagwada: गोवा मुक्ती नंतर ते आजतागायत मोर्ले बागवाडा या ठिकाणी असलेल्या अरुंद पुलामुळे ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या होत्या. सदर पुलाच्या जागी नवीन रुंद पुलाची उभारणी करावी अशी ग्रामस्थांची मागणी होती. या मागणीला अखेर पंधरा वर्षांनंतर यश आले आहे.

आमदार डाॅ. दिव्या राणे व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या प्रयत्नामुळे या पुलाला अखेर मंजुरी मिळाली आहे. सुमारे 13 कोटी रुपये खर्च करुन हा नविन पुल बांधण्यात येणार आहे.

New Bridge Will Be Constructed At Morlem Bagwada
Banastarim Accident: बाणस्तारी अपघाताच्या चौकशीसाठी तपास पथकाची स्थापना; निधीन वाल्सन यांच्याकडे नेतृत्व

मोर्ले बागवाडा या ठिकाणी हा पूल आहे. हा पुल अत्यंत कमकुवत झाला होता. बागवाड्यावर जाणाऱ्यासाठी हा अरुंद पुल असल्याने येथून पायी व दुचाकीनेच प्रवास करावा लागतो.

चारचाकी वाहनांना 7 किलो मीटर अंतर काढून जावे लागते. हा नवीन पुल झाला तर अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरच गाठावे लागले.

श्रावण महिन्यातच नवीन पुलाच्या कामाची पायाभरणी करण्यात येणार आहे. या पुलासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत व बांधकाममंत्री निलेश काब्राल यांचे विशेष योगदान आहे.

या पुलाचा फायदा सुमारे 3 हजार नागरिकांना होणार असुन केरी, घोटेली, धनगरवाडा व इतर गावांना दोन पंचायतीमधील अंतर कमी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com