Goa museum scheme  Dainik Gomantak
गोवा

Museum Funding Goa: संग्रहालये उभारणीसाठी, विकासासाठी गोवा सरकारची खास योजना! 5 लाखांचे अर्थसाहाय्य मिळणार

Museum scheme Goa: जुन्या संग्रहालयाच्या साधनसुविधा विकासासाठी प्रत्येकी ५ लाख रूपये तसेच नव्या संग्रहालयाच्या उभारणीसाठी ५ लाख रूपये,अशी तरतूद करण्यात आली आहे.

Sameer Panditrao

Goa government museum development scheme

पणजी: गोवा सरकारने राज्यातील वस्तु संग्रहालयांमध्ये वृद्धी व्हावी, त्यांचे योग्य संगोपन व्हावे यादृष्टीने नवीन वस्तुसंग्रहालये उभारणीसाठी तसेच जी वस्तुसंग्रहालये आहेत त्यांच्या साधनसुविधांसाठी संग्रहालय संचालनालयाने नवी योजना आणली असून या योजनेतून संस्थांना प्रत्येकी ५ लाख रूपये मिळतील, असे अधिसूचित करण्यात आले आहे.

राज्यातील नोंदणीकृत असलेल्या खासगी संग्रहालयांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ज्या संस्थांची किंवा ज्यांची वैयक्तिक अशी पुरातन वास्तू, अंकशास्त्र, चित्रे, लोककला, हस्तलिखिते इतर कोणतीही संग्रहालये ज्यातून गोव्याचा इतिहास, जीवन किंवा संस्कृती, प्रतिबिंबित होते किंवा एखादी अनोखी संकल्पना जी सरकारच्या परवानगीने राबविण्यात येईल, अशा संग्रहालयांना या योजनेचा लाभ घेता येणार.

हे अर्थ सहाय्य दोन विभागात देण्यात येणार आहेत. ज्यात जुन्या संग्रहालयाच्या साधनसुविधा विकासासाठी प्रत्येकी ५ लाख रूपये तसेच नव्या संग्रहालयाच्या उभारणीसाठी ५ लाख रूपये,अशी तरतूद करण्यात आली आहे. परंतु यासंबंधीचे नियम व अटींचाही संबंधित संग्रहालयाला पाठपुरावा करावा लागणार आहे.

तज्ज्ञ समिती करणार अर्जांची छाननी

या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत संग्राहलयांना प्रस्ताव सादर करावा लागेल. त्यानंतर तज्ञ समिती नेमून ते समिती प्रस्ताव किंवा अर्जांची छाननी करून प्रतिवर्षी दोन्ही विभागात प्रत्येकी एका संग्रहालयाची निवड करण्यात येईल, तसेच या योजनेतून एका संग्रहालयाला केवळ एकाचवेळी या योजनेचा लाभ घेता येणार असल्याचे अधिसूचित करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

SCROLL FOR NEXT