Water Supply Management Master Plan Dainik Gomantak
गोवा

Water Supply Scheme: पाणीप्रश्नावर राज्य 'गंभीर'! पुरवठा योजनेचा मास्टर प्लॅन तयार; अनेक गावांची तहान भागणार

Water Supply Management Master Plan: राज्यात नव्याने निर्माण होणाऱ्या वसाहती, तसेच दरवर्षी वाढती पर्यटकांची संख्या, हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील बदलते स्वरूप यामुळे दिवसेंदिवस पाण्याची मागणी वाढत आहे. भविष्यकाळातील मागणी आणि तुटवडा लक्षात घेऊन राज्य सरकारने पाणी टंचाईची समस्या टाळण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Water Supply Management Master Plan

पणजी: राज्यात नव्याने निर्माण होणाऱ्या वसाहती, तसेच दरवर्षी वाढती पर्यटकांची संख्या, हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील बदलते स्वरूप यामुळे दिवसेंदिवस पाण्याची मागणी वाढत आहे. भविष्यकाळातील मागणी आणि तुटवडा लक्षात घेऊन राज्य सरकारने पाणी टंचाईची समस्या टाळण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला आहे. सुमारे २५० एमएलडी पाणी पुरवठ्याच्या योजना निर्मितीस प्रारंभ केला आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याची (साबांखा) खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे, पाणी प्रक्रिया क्षमता ६५५ एमएलडी आहे, तर विभागामार्फत २० एमएलडी पाणी विभागाच्या ग्रामीण योजनेतून पुरविले जाते. पाणी पुरवठ्याचे काम साबांखातर्फे केले जाते, तर साठवणुकीची कामे जलस्रोत खात्याकडून केली जाते. पाणी पुरवठ्यासाठी लागणारी जलप्रक्रिया प्रकल्पाची उभारणी साबांखाकडून होते. सध्या विविध क्षमतेचे जलप्रक्रिया प्रकल्पांची उभारणी होत आहे. साबांखातर्फे घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक वापरासाठी पाणी पुरवठा केला जातो.

समस्या सुटणार!

पीळर्ण-साळगाव पठारावर १५ एमएलडी पाणी जल शुद्धीकरण प्रकल्प उभारला जात आहे, ज्यामुळे कळंगुट आणि साळगाव मतदारसंघातील पाणी टंचाईची समस्या दूर होणार आहे. दरवर्षी या भागात पाण्याची समस्या उद्‍भवते, त्यामुळे या परिसरातील नागरिकांना टँकर मागवावे लागतात. प्रकल्प कार्यान्वित होताच या भागातील नळपाणी पुरवठ्याची समस्या कायमची दूर होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Fish Market: मडगाव 'मासळी मार्केट'ची इमारत बांधून वर्ष उलटलं, पण उद्घाटनाला मुहूर्त मिळेना! व्यापारी आणि मच्छीमार संभ्रमात

Goa Schools Reopening: उन्हाळी सुट्टीनंतर परत वाजली शाळांची घंटा! डिचोलीतील शाळांत 95 टक्क्यांहून अधिक उपस्थिती; नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण

Railway Tender Fraud: रेल्वे निविदेच्या आमिषाने साडेतीन लाखांना 'टोपी', पुण्यातील संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

Cortalim Accident: कोटार्लीत 2 दुचाकींच्‍या अपघातात तिघे जखमी, बुलेटचालकाचा निष्‍काळजीपणा; गुन्हा नोंद

Illegal Arms Smuggling: 'देशी कट्टा'चे वाढते सावट! परप्रांतीय कामगारांच्या माध्यमातून शस्‍त्रास्‍त्रांची तस्करी

SCROLL FOR NEXT