Goa government immediately withdrew order of Ganeshotsav SOP rules Dainik Gomantak
गोवा

Goa Ganesh Chaturthi 2021: गणेशोत्सव SOPचा 'तो' आदेश तात्काळ मागे

गोवेकरांमध्ये रंगली चर्चा, गणेशोत्सव पूजनासाठी घरोघर जाण्यास भटजींना प्रतिबंध

दैनिक गोमन्तक

पणजी: गणेशोत्सव (Ganesh Chaturthi) पूजनासाठी घरोघर जाण्यास भटजींना प्रतिबंध करण्याचा आदेश सरकारने जारी केला, मात्र काही तासांत तो मागे घेण्याची वेळ सरकारवर (Goa Government)आली. गणेशोत्सव साजरा करणाऱ्या कुटुंबांनी युट्यूब, व्हिडीओ, व्हॉटसॲप व्हिडीओ आदी ‘ऑनलाईन फॉर्मेट’चा वापर करून गणरायाची पूजा करावी, असेही सरकारने अतिरिक्त सर्वसाधारण सूचना जारी करताना नमूद केले होते.

सरकार कोविडच्या तिसऱ्या लाटेची धास्ती सर्वांनी घ्यावी, असे सांगत आहे. भाजपने आपल्या कार्यकर्त्यांना तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशिक्षितही केले आहे. या पार्श्वभूमीवर कोविड प्रतिबंधात्मक कडक नियमावली सरकार जारी करेल, असे अपेक्षित होते त्यानुसार ती जारी केली गेली मात्र त्याचे पडसाद काय उमटतील, याचा राजकीय अंदाज घेत ती नियमावली मागे घेण्यात आली. यामुळे सरकारला जनतेच्या आरोग्यापेक्षा राजकीय लाभाचीच अधिक चिंता असावी, असे दिसते.

काय होती ‘ती’ नियमावली...

1) सरकारने जारी केलेल्या नियमावलीत चित्रशाळांतून मूर्ती घरोघर पाठवण्याची व्यवस्था करावी. मुले व ज्येष्ठ नागरिकांनी चित्रशाळांपर्यंत येऊ नये. बाजार व चित्रशाळांच्या ठिकाणी थर्मल गनचा वापर करावा. शारीरिक अंतर, सॅनिटायझरचा वापर, मास्कचा वापर आदी अटींचे पालन करून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करता येईल.

2) गर्दी खेचणारी जाहिरातबाजी सार्वजनिक गणेशोत्सवांनी करू नये. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे आयोजित करावीत. गृह अलगीकरणात असणाऱ्यांनी कोणाला घरी प्रवेश देऊ नये किंवा स्वतः इतरांच्या घरी जाऊ नये. सायंकाळी 5 ते रात्री 10 यावेळेतच मूर्ती विसर्जन करता येणार, असा नियम होता.

"मी वैयक्तिकरीत्या गणेशोत्सव कोविड मार्गदर्शक सुचनांशी सहमत नव्हतो. तज्ज्ञ समितीच्या शिफारशी या सूचना म्हणून जारी करण्यात आल्या होत्या. भटजींनी आपल्या घरी येऊन गणपतीची पूजा करावी असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे या सूचना मागे घेतल्या. प्रत्येकाने सण साजरा करताना कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे."

- प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT