Goa Government Hotels: Dainik Gomantak
गोवा

Goa Government Hotels: स्वस्तात गोवा ट्रिप करायचीय? मग 'या' सरकारी हॉटेल्समध्ये करा बुकिंग

जाणून घ्या येथे वास्तव्यासाठी किती खर्च येतो

Akshay Nirmale

Government Hotels in Goa: एकीकडे स्वच्छ समुद्रकिनारे आणि दुसरीकडे हिरवा निसर्ग अशा नटलेल्या गोव्यामुळे देशविदेशातील पर्यटकांची पर्यटनासाठी गोव्याला पहिली पसंती असते. गोव्याला दुसरे मालदिव असेही म्हटले जाते.

त्यावरून गोव्याच्या पर्यटनाला किती ग्लॅमर आहे, याची प्रचिती यावी. तथापि, गोव्यात येणाऱ्या भारतीय पर्यटकांना गोव्यातील हॉटेल्समध्ये राहणे अनेकांना महागडे वाटू शकते. पण, गोव्यात इतर हॉटेल्सच्या तुलनेत स्वस्तःत राहण्याची सोय येथील सरकारी हॉटेलमध्ये होऊ शकते.

या हॉटेल्समध्ये राहण्यासाठी एका रात्रीसाठी 1900 ते 2500 रुपये भाडे असेल. तुम्हाला केवळ पीक टाईमपुर्वी ते बुक करावे लागेल. कारण पीक टाईममध्ये गोव्यातील राहण्याचा खर्च महाग होत असतो, किंमती खूप वाढतात.

पण, या सरकारी हॉटेल्समुळे तुमची गोव्याची ट्रिप स्वस्तःत मस्त, किफायती होऊ शकते. गोव्यातील ही सरकारी हॉटेल्स तुमचे बजेट सांभाळू शकतात. ही हॉटेल्स बूक केली तर गोव्याची ट्रिप तुम्हाला कधीच महागडी वाटणार नाही.

अनेक लोकांना याबाबत माहिती नाही. पण, ही सरकारी हॉटेल्स फार महागडी नसतात. त्यामुळे ती खिशाला परवडू शकतात. गोव्यातील या सरकारी हॉटेल्सविषयी जाणून घेऊया.

कोलवा रेसिडेन्सी

कोलवा रेसिडेन्सी कोलवा बीच रोडवर आहे. येथे डबल रूम आहेत, त्यामध्ये स्टँडर्ड, एसी स्टँडर्ड रूम्स आहेत. हे हॉटेल लोकांच्या सोयींनुसार तयार करण्यात आले आहे. येथे एकूण 47 खोल्या आहेत. पर्यटक येथे आरामात राहू शकतात. येथे एका रूमची किंमत एका रात्रीसाठी 2300 ते 2530 रुपये इतकी आहे.

मिरामार रेसिडेन्सी

पणजीत मिरामार बीच जवळ हे हॉटेल आहे. येथे एसी स्टँडर्ड रूम, एसी डिलक्स, एसी सूट अशा रूम्स आहे. हे हॉटेल समुद्रकिनाऱ्याच्या अगदी समोर आहे. येथून तुम्हाला सुंदर नजारे पाहता येतील. येथे 60 खोल्या आहेत. येथे रूमचे भाडे 2300 ते 3400 रुपये आहे.

कळंगुट रेसिडेन्सी

कळंगुट रेसिडेन्सी हॉटेलसह एक रेस्टॉरंट देखील येथे आहे. गोव्यातील हे हॉटेल गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 22 किलोमीटर अंतरावर आहे. येथे सर्व सुविधांसह एसी, नॉन एसी रूम्स आहेत. येथील रूमसाठी सुमारे 2000 ते 2500 रुपये प्रतिदिन खर्च येईल.

फार्मागुडी रेसिडेन्सी

फोंडा येथील फार्मागुडी रेसिडेन्सी येथेही रूम्स असतात. येथे एसी स्टँडर्ड रूम, डबल रूम स्टँडर्ड, एसी सूट, वसतिगृह प्रति बेड आहे. येथील रूम्स, सुटचे प्रतिदिन भाडे 1500 ते 2900 रूपयांदरम्यान आहे.

वास्को रेसिडेन्सी

वास्को द गामा येथील म्युनिसिपल गार्डनसमोर वास्को रेसिडेन्सी आहे. येथील डबल रूम्स पर्यटकांना परवडणाऱ्या आहेत. येथेही सर्व सुविधा उपलब्ध आहेत. येथे 45 खोल्या उपलब्ध आहेत. येथील रूमच्या किंमती 1700 ते 2000 रुपयांच्या दरम्यान आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

UNESCO List: युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेले शिवरायांचे 12 किल्ले कोणते? कोठे आहेत, इतिहास काय, कसे जाल? जाणून घ्या सर्व माहिती

Water Rafting Goa: पावसाळ्यात गोव्यात जाताय? सत्तरीत व्हाईट-वॉटर राफ्टिंगला झालीये सुरूवात; अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

Marathi Schools Goa: 'पालकांमुळे बंद पडल्या गोव्यातील मराठी शाळा'; शिक्षणमंत्री प्रमोद सावंत

SCROLL FOR NEXT