Goa government has changed rules for Michael Lobo Dainik Gomantak
गोवा

मायकल लोबोंच्या थयथयाटानंतर थेट अभियंत्याची बदली

मायकल लोबो यांना आपले म्हणने खरे करता यावे, यासाठी गोवा सरकारने नियम बदलला.

दैनिक गोमन्तक

पणजी: ज्या सार्वजनिक बांधकाम खात्यातील अभियंत्याच्या बदलीमुळे घनकचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो (Michael Lobo) आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांच्या जुंपली होती. त्यात आता मायकल लोबो यांनी आपले म्हणने खरे करून दाखविले आहे.

रॉबर्ट डिसोझा या सार्वजनिक बांधकाम थिवी या कार्यालयात काम करणाऱ्या अभियंत्याला म्हापसा कार्यालयात साहाय्यक सर्वेअर म्हणून बसविण्यात आले होते. त्याची आता मायकल लोबो यांच्या थयथयाटानंतर कळंगुट येथे बदली करण्यात आली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कळंगुटमध्ये यापूर्वीच पीडबल्यूचा साहाय्यक अभियंता नियुक्त केलेला आहे आणि कळंगुटच्या अभियंत्याकडून हळदोणे विभाग काढून आला. तो आता रॉबर्ट डिसोझा यांना देण्यात आला आहे.

डिसोझा यांनी केवळ शिवोलीकडे लक्ष दिले. त्यामुळे थिवी मतदारसंघावर अन्याय झाला होता. अनेक तक्रारीनंतर राबर्ट यांची म्हापसा कार्यालयात सर्वेअर म्हणून बदली करण्यात आली होती. आताही नव्या आदेशानुसार, रॉबर्ट हे म्हापसा कार्यालयात सर्वेअर म्हणून काम पाहताना कळंगुट येथेही त्यांना दुहेरी पदभार देण्यात आला आहे. बांधकाम विभागाच्या नियमानुसार, कळंगुट येथे एक साहाय्यक अभियंता असताना तिथे दुसरा अभियंता नियुक्त केला जाऊ शकत नाही. परंतु, मायकल लोबो यांना आपले म्हणने खरे करता यावे, यासाठी सरकारने नियम बदलला.

क्षमता असलेल्यांना उमेदवारी द्या

विजयाची क्षमता असलेल्या उमेदवारालाच पक्षाची उमेदवारी देण्याची गरज आहे, असे मी भाजपे प्रभारी देंवेंद्र फडणवीस यांनीही सांगितले आहे. त्याचेही तेच म्हणने आहे. शिवोली मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे तुमचे जिवलग मित्र रिकार्डो यांनी उघड केले आहे त्यामुळे तुम्ही पाठिंबा देणार का यावर लोबो यांना विचारले असता पाठिंबा कोणाला द्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. मी त्यावर अधिक काही बोलू शकत नाही, असे सांगितले.

खड्ड्यांवरील वाद मुख्यमंत्र्यांपर्यंत

राज्यातील रस्त्यांची स्थिती दयनीय झाली आहे. या रस्त्यांच्या डागडुजीबाबत बांधकाममंत्री कोणतीच पावले उचलत नसल्याने वाद झाल्याची कबुली कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी दिली. हा वाद मुख्यंत्र्यांपर्यतही पोहोचला. लोकांना सुरळीत पाणी पुरवठा तसेच चांगले रस्ते हवे आहेत त्यासाठी स्वतःची जबाबदारी स्वीकारून प्रत्यक्षात काम करण्याची गरज आहे. ते हे काम करत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घ्यावा, असे मत लोबो यांनी व्यक्त केले.

बार्देश तालुक्यातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. या रस्त्यांवरून वाहने चालविताना चालकांच्या वाहनाचे नुकसान तर होते आहे त्याशिवाय चालकांच्या शारीरिकतेवर परिणाम होत आहे. पंचायत व पालिका परिसरातील लोक स्थानिक आमदारांना त्याचा जाब विचारतात. वेळोवेळी संबंधित मंत्र्यांना सांगूनही त्याची पूर्तता केली जात नसल्याने स्थानिक आमदार लोकांसमोर तोंडघशी पडत आहे. त्यामुळे बांधकामंत्र्यांना यासंदर्भात विचारले असता थोडा वाद झाला. माझे लक्ष बार्देश तालुक्यापुरतेच नाही तर इतर तालुक्यांमध्येही माझे संबंध आहेत. त्यामुळे राज्यातील रस्त्यांची झालेली चाळण याबाबत मंत्र्यांना विचारले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

SCROLL FOR NEXT