Goa Cattle Care Funds Dainik Gomantak
गोवा

Goa Cattle Care Funds: राज्यातील गोशाळांसाठी सरकारने किती निधी दिला? आकडेवारीसमोर

Goa Government Cattle Welfare Initiatives: गोव्यातील गो-संगोपन आणि संवर्धनासाठी शासनाने मागील तीन आर्थिक वर्षांत तब्बल ५१ कोटींपेक्षा जास्त निधी वितरित केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोव्यातील गो-संगोपन आणि संवर्धनासाठी शासनाने मागील तीन आर्थिक वर्षांत तब्बल ५१ कोटींपेक्षा जास्त निधी वितरित केला आहे. उपलब्ध माहितीनुसार वर्ष २०२२-२३ मध्ये १४,३८,८६,९५५ कोटी, २०२३-२४ मध्ये २६,६५,०२,४४५ कोटी आणि २०२४-२५ मध्ये १०,६०,६४,८५१ कोटी इतका निधी गोशाळांना वितरित करण्यात आला आहे.

गोमाता संवर्धनासाठी राज्य सरकारने घेतलेला पुढाकार हा गोशाळा व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरत आहे. शासनाच्या या प्रयत्नांमुळे गाईंची देखभाल अधिक चांगल्या प्रकारे केली जाऊ शकते.

एकूण ५६६८ गायींच्या देखभालीसाठी हा निधी वितरित करण्यात आला आहे. मागील तीन वर्षांत ८४९ नव्या गाईंची नोंदणी करण्यात आली, तर मृत झालेल्या गाईंची संख्या १९३९ इतकी होती. यातील अनेक गायींचे शवविच्छेदन देखील करण्यात आले. गोशाळांमधील गाईंचे संगोपन, चारा, वैद्यकीय सुविधा आणि देखभाल यासाठी शासनाकडून दरवर्षी आर्थिक मदत केली जाते. गोमाता संरक्षण आणि संवर्धन हे सरकारचे (Government) प्राधान्य असल्याने, यापुढेही या निधीत वाढ करण्याची शक्यता असल्याचे खात्याने सभागृहात दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे.

शासनाकडून प्राप्तनिधी

गोमंतक गौसेवक महासंघ, मये-डिचोली यांना मागील तीन वर्षांत सर्वाधिक ३९.५ कोटी निधी मिळाला, ज्यामुळे त्यांना त्यांच्या गोशाळेतील ४२४५ गाईंची काळजी घेता आली.

ध्यान फाउंडेशन, गोवा यांना एकूण ६.८ कोटी.

अखिल विश्व जयश्रीराम गोसंवर्धन केंद्र, सावईवेरे यांना ३.२ कोटी.

लिव्ह सिनर्जी, सावईवेरे केंद्राला २२.५ लाख.

वेल्फेर फॉर ॲनिमल इन गोवा शिवोली केंद्रासाठी ५५ लाख.

शंखवली तीर्थक्षेत्र गोशाळा ट्रस्ट सांकवाळ केंद्राला ४.३ लाख.

कामधेनू गोरक्ष संस्था काणकोण केंद्राला १७.८९ लाख.

ऑर्गनायझेशन फॉर पीपल अँड अॅनिमल वेल्फेर, दाभाळ फोंडा केंद्राला ३३.०३ लाख.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT