Goa Liberation Day Dainik Gomantak
गोवा

Goa Liberation Day: गोवा सरकारला दोडामार्ग येथील स्वातंत्र्य सैनिकांचे विस्मरण

गोवा मुक्ती लढ्यात योगदान देणाऱ्या गोव्यानजीकच्या दोडामार्गमधील स्वातंत्र्यसैनिक गोवा सरकारच्या सन्मानापासून वंचित आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa Liberation Day: गोवा आपला 61वा मुक्ती दिन येत्या 19 डिसेंबर रोजी साजरा करणार आहे. या मुक्ती संग्रामात सहभागी झालेल्या गोव्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा येथोचित सन्मान केला जाणार आहे. मात्र, गोवा मुक्ती लढ्यात योगदान देणाऱ्या गोव्यानजीकच्या दोडामार्गमधील स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांचे कुटुंबीय गोवा सरकारच्या सन्मानापासून वंचित आहेत.

कै.नीळकंठ कामत यांचे पूत्र आनंद ,कै.सुधाकर मणेरीकर यांचे पुत्र सुमंत, शिवराम मणेरीकर यांचे नातू सचिन व कै.राजाराम हजारे यांचे पुत्र देवानंद यांनी वाडवडिलांनी गोव्यासाठी लढा देऊनही त्यांची गोवा सरकारने आजवर दखल घेतली नसल्याची खंत व्यक्त केली.

भारत देश इंग्रजांच्या तावडीतून स्वतंत्र होताच गोवा मुक्तीचेही वारे वाहू लागले. संपूर्ण देशाचे लक्ष गोव्याकडे व गोव्यासोबत दोडामार्ग शहराकडे लागले. कारण गोव्यातील जनतेला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी अनेक ठिकाणचे स्वातंत्र्य सैनिक दोडामार्गमध्ये दाखल झाले होते. पोर्तुगीजांनी गोव्यात अनेक वस्तूंना बंदी घातली होती, गोमंतकीय बांधवांना या निर्बंधित वस्तू मिळाव्यात म्हणून दोडामार्गातील अनेकांनी हालअपेष्टा सोसून त्या गोमंतकीयांना पुरवल्या.

त्यावेळी कै. मधुकर कुबडे, कै. नीळकंठ कामत, कै. धोंडू राणे आदींना दोडामार्गातून हद्दपार केले होते. पोर्तुगीजांविरोधात निघणारे मोर्चे आंदोलनांत सहभागी होणाऱ्यांना मरणप्राय मारहाण सोसावी लागत असे. तरीही अनेकांनी अविरत कार्य सुरू ठेवले होते.

पुरावे बेचिराख झाले, अन् ओळखही !

भारतीय सैन्याच्या अचूक युद्धनीतीपुढे हतबल झालेल्या पोर्तुगीजांनी गोवा सोडून जाताना लहान-मोठे पूल उडवून दिले. बरीच कार्यालये,निवासस्थाने यांना अक्षरश: पेटवून दिली.त्या आगीत गोव्यातील अनेक दस्तावेजांसोबत दोडामार्गमधील स्वातंत्र्यसैनिकांच्या कामकाजाची नोंदही बेचिराख झाली,अन् त्यांची ओळखही. त्याचा फटका दोडामार्गातील अनेकांनाही बसला.

अनेकांच्या नशिबी अनामवीराचे जीणे

कै. शिवराम उर्फ बाळाकाका मणेरीकर ,कै.सुधाकर मणेरीकर, कै. नीळकंठ कामत ,कै. मधुकर कुबडे, कै. धोंडू राणे ,कै. शशिकांत प्रसादी, कै हरिश्‍चंद्र सावंत, कै. राजाराम हजारे , कै. बापू बोर्डेकर, कै. चंद्रकांत चांदेलकर ,कै. यशवंत विष्णू रेडकर आदी नावांचा उल्लेख गोवा मुक्ती लढ्यातील स्वातंत्र्यसेनानी म्हणून करता येईल. शिवाय अनेकांच्या कार्याची सरकार दरबारी नोंद न झाल्याने त्यांचे कार्य पुढे येऊ शकले नाही.

सूर्यकांत परमेकर यांचा सन्मान व्हावा!

या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेला असे दोडामार्ग बाजारपेठेतील एकमेव स्वातंत्र्यसैनिक सूर्यकांत वसंत परमेकर सध्या हयात आहेत, त्यांचाही मान सन्मान होणे अपेक्षित आहे. गोवा सरकारने याकडे लक्ष देऊन त्या वंचित स्वातंत्र सैनिकांना योग्य सन्मान द्यावा, अशी दोडामार्ग वासीयांची व त्यांच्या कुटुंबीयांची मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Temba Bavuma Record: बावुमाचे 'मिशन वर्ल्ड रेकॉर्ड'! गुवाहाटीत भारताला हरवून इतिहास रचण्याची संधी, जे कुणालाच नाही जमलं ते करुन दाखवणार

नावेलीत मांस दुकानात गायीचे कापलेले शिर आढळल्याने खळबळ, दुकानदाराला अटक, नंतर जामिनावर सुटका; काय नेमकं प्रकरण?

लहानग्या 'अमूर फाल्कन'ची थक्क करणारी भरारी! एका दिवसात 1000 किमी प्रवास करुन रचला नवा कीर्तिमान; वन्यजीव संशोधकही हैराण

Dacoity Case Goa: तोंडावर मास्क, हातात शस्त्र, घरातल्यांना केली जीवघेणी मारहाण; बायणात सव्वाकोटींचा ऐवज घेऊन 8 दरोडेखोर पसार

New Rent Rules: भाडेकरु आणि घरमालकांसाठी 'नवीन रेंट करार नियम 2025' लागू, वाद मिटवण्यासाठी विशेष न्यायालये; वाचा काय आहेत नवे नियम?

SCROLL FOR NEXT