Loan Dainik Gomantak
गोवा

Goa: गोवा सरकारसमोर साडेतीन हजार कोटींचे कर्ज फेडण्याचे आव्हान! मोपा, खाणव्यवसायातील महसूलाकडे लक्ष

Goa government revenue challenges: वित्त खात्यातून मिळालेल्या माहितीनुसार, २०२२-२३ आर्थिक वर्षातील महसुली शिल्लक २ हजार ४०० कोटी रुपये होती.

Sameer Panditrao

Goa government revenue from mining and airport projects

पणजी: मोपा विमानतळ प्रकल्पातून १३० कोटी रुपयांचा महसूल सरकारला मिळणार आहे. खाणींतून ५०० कोटी रुपयांचा महसूल मिळेल असे सरकारने गृहित धरले आहे. तसेच महुसली शिल्लक २ हजार ५०० कोटी रुपयांवर असेल. याआधारावर येत्या आर्थिक वर्षात साडेतीन हजार कोटी रुपयांचे कर्ज फेडण्याचे आव्हान सरकार पेलणार आहे.

वित्त खात्यातून मिळालेल्या माहितीनुसार, २०२२-२३ आर्थिक वर्षातील महसुली शिल्लक २ हजार ४०० कोटी रुपये होती. यंदा २०२३-२४ आर्थिक वर्षात डिसेंबरपर्यंत १ हजार ४२३ कोटी रुपये महसुली शिल्लक आहे. ती मार्चपर्यंत अडीच हजार कोटी रुपयांवर जाणार आहे. शेवटच्या तीन महिन्यांत सरकारचा खर्च कमी होतो आणि कर रुपी महसुल वाढतो.

सरकारच्या महसुलात मूल्यवर्धित कर (व्हॅट) आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी) यांचा महत्त्वाचा वाटा आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२४ या कालावधीत एकूण महसूल ४ हजार ६१४.७७ कोटी रुपये होता, जो मागील वर्षाच्या याच कालावधीपेक्षा ३६५.४३ कोटी रुपयांनी अधिक आहे. या वाढीमध्ये जीएसटी महसूल ९.६२ टक्के व व्हॅट महसूल ६.४१ टक्क्याने वाढला आहे. म्हणजेच, व्हॅट महसुलात ६.४१ टक्के वाढ झाली आहे.

राज्यावर ३० हजार कोटींचे कर्ज

२०१४-२०१५ पासून सरकारने विकासकामांसाठी खुल्या बाजारातून कर्ज घेण्यास सुरुवात केली, आणि आता या कर्जांच्या परतफेडीची वेळ आली आहे. सध्या, गोव्याचे एकूण सार्वजनिक कर्ज सुमारे ३० हजार कोटी रुपये आहे, ज्यावर वार्षिक २ हजार कोटी रुपयांपर्यंत व्याज द्यावे लागते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT