Goa Mining: गोव्यासाठी मोठी बातमी! 3 खाणपट्ट्यांसाठी पर्यावरण दाखल्यांचा मार्ग मोकळा

Environmental Clearances Goa Mining: कुडणे करमले, कुडणे आणि थिवी पीर्ण खाणपट्ट्यांसाठी पर्यावरण दाखले मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे‌ खाणपट्टे ई-लिलावात जिंकलेल्या कंपन्यांनी पर्यावरण दाखल्यांसाठी राज्य पर्यावरण आघात मूल्यांकन समितीसमोर केलेले अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.
Goa Mining
MineDainik Gomantak
Published on
Updated on

Environmental Clearances Goa Mining

पणजी: कुडणे करमले, कुडणे आणि थिवी पीर्ण खाणपट्ट्यांसाठी पर्यावरण दाखले मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे‌ खाणपट्टे ई-लिलावात जिंकलेल्या कंपन्यांनी पर्यावरण दाखल्यांसाठी राज्य पर्यावरण आघात मूल्यांकन समितीसमोर केलेले अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.

गोव्याच्या खाण क्षेत्रासाठी मोठी चालना देणारी अशी‌‌ ही घडामोड आहे. कुडणे करमले‌ खाणपट्टा वेदान्ताने मिळवला‌ असून वार्षिक ०.५ दशलक्ष टन खनिज उत्पादनाची क्षमता आहे. या खाणीचे क्षेत्र ३८४.३१ हेक्टर आहे. थिवी पीर्ण खाणपट्टा साळगावकर शिपिंगला‌ मिळाला आहे. वार्षिक ३३ हजार टन खनिज उत्पादन अपेक्षित आहे. या खाणीचे एकूण क्षेत्र ८ हेक्टर आहे. तिसरा खाणपट्टा जेएसडब्ल्यू स्टीलला मिळाला आहे.

Goa Mining
Goa Police: कायद्याच्या रक्षकांकडूनच त्रास; दिल्लीच्या पर्यटकांशी गैरवर्तन, गोव्यात तीन वाहतूक पोलिस निलंबित

पर्यावरण दाखले मिळाल्यावर खाणपट्टाधारक कंपन्यांना संबंधित सर्व कायदेशीर परवानग्या आणि मंजुरी घ्यावी लागतील. पर्यावरणीय परिणाम अधिसूचनेच्या नियमांचे कठोर पालन करणे बंधनकारक आहे. पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.

पर्यावरण आघात मूल्यांकन समितीने स्पष्ट केले आहे की, सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच अंतिम मंजुरी दिली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com