Divyangbandhan Scheme Dainik Gomantak
गोवा

Divyangbandhan Scheme: दिव्‍यांग जोडप्‍यांना यापुढे मिळणार 1 लाख रुपये! विवाहबंधन योजनेत दुरुस्‍ती; अधिसूचना जारी

Divyang marriage financial assistance Goa: विवाहबंधनात अडकलेल्‍या दिव्‍यांग व्‍यक्तींना यापुढे दिव्‍यांगबंधन योजनेअंतर्गत एक लाख रुपयांचे अर्थसाहाय्‍य मिळणार आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: विवाहबंधनात अडकलेल्‍या दिव्‍यांग व्‍यक्तींना यापुढे दिव्‍यांगबंधन योजनेअंतर्गत एक लाख रुपयांचे अर्थसाहाय्‍य मिळणार आहे. याआधी ही रक्कम ५० हजार इतकी होती, परंतु सरकारने योजनेत दुरुस्‍ती करून ही रक्कम ५० हजारांहून एक लाख रुपये इतकी केली आहे. दिव्‍यांग खात्‍याच्‍या संचालक वर्षा नाईक यांनी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.

राज्‍यातील दिव्‍यांग जोडप्‍यांना आर्थिक बळकटी देण्‍याच्‍या हेतूने सरकारने काही वर्षांपूर्वी दिव्‍यांगबंधन योजना सुरू केली. पती–पत्‍नीपैकी एकजण किंवा दोघांमध्‍ये किमान ४० टक्‍के दिव्‍यांगत्‍व असेल, तर ती जोडपी या योजनेसाठी पात्र ठरतात.

त्‍यांचे वार्षिक उत्‍पन्‍न आठ लाखांपेक्षा अधिक असू नये, १५ वर्षांपासून गोव्याचा रहिवासी असावा, विवाहापासून तीन वर्षांच्या आत त्‍यांनी योजनेसाठी अर्ज केलेला असावा, त्‍यांचा विवाह गोव्यात झालेला असावा किंवा गोव्यामध्ये नोंदणीकृत असावा अशा अटी घालण्यात आल्या आहेत.

...तर अर्थसाहाय्य वसूल करणार!

दिव्‍यांगबंधन योजनेसाठी सादर केलेल्‍या अर्जात अर्जदाराने चुकीची माहिती सादर केल्‍याचे आढळून आल्‍यास त्‍यांना अर्थसाहाय्‍य देण्‍यात येणार नाही. किंबहुना ज्‍यांना ते याआधी देण्‍यात आलेले आहे, त्‍यांच्‍याकडून ते पूर्णपणे वसूल केले जाणार असल्‍याचे नाईक यांनी अधिसूचनेत म्‍हटले आहे.

दोन वर्षांत केवळ दोनच जोडप्‍यांनी घेतला लाभ

राज्‍यात हजारो दिव्‍यांग व्‍यक्ती असूनही गेल्‍या दोन वर्षांत केवळ दोन जोडप्‍यांनी दिव्‍यांगबंधन योजनेचा लाभ घेतलेला आहे, असे वर्षा नाईक यांनी ‘गोमन्‍तक’ला सांगितले. या योजनेचा अधिकाधिक प्रचार आणि प्रसार खात्‍याकडून केला जात असल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhagwan Mahavir: धुक्यात हरवलेले जंगल, फेसाळणारा दूधसागर आणि वन्यजीवांचा थरार; पावसात नक्की भेट द्या गोव्याच्या 'या' अभयारण्याला

डिचोली बाजारात वीजवाहिन्यांचा धोका; 'स्पार्क'मुळे व्यापारी भयभीत, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Goa Sports Complex: कांपाल क्रीडा, व्यापारी सुविधा भाडेपट्टीवर; खासगी संस्थेमार्फत चालविण्याचा राज्य सरकारचा निर्णय

Goa Athletics Championship: राज्यस्तरीय ॲथलेटिक्सला मोठा प्रतिसाद; मनोहर पर्रीकर स्मृती स्पर्धेत 2 हजार ॲथलीट्सचा सहभाग अपेक्षित

VIDEO: शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची एन्ट्री; पाकिस्तानचा खरा चेहरा उघड! व्हिडिओ चर्चेत

SCROLL FOR NEXT