online government services Dainik Gomantak
गोवा

Government Services: गोव्यात डिजिटल धमाका; 241 सरकारी सेवा थेट व्हॉट्सॲपवर!!

Government Digital Services: नागरिकांना सरकारी कार्यालयांमध्ये हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही आणि सरकारी सेवा सहजपणे त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध होतील

Akshata Chhatre

पणजी: गोवा सरकारने नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यात सरकारकडून देण्यात येणाऱ्या २४१ सेवा आता थेट व्हॉट्सॲपद्वारे उपलब्ध होणार आहेत. यामुळे नागरिकांना सरकारी कार्यालयांमध्ये हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही आणि सरकारी सेवा सहजपणे त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध होतील.

शनिवारी (दि.१५) राज्य सरकारने 'गोवा ऑनलाइन' सेवा व्हॉट्सॲपशी जोडण्याची घोषणा केली. यामुळे नागरिकांना सरकारी कागदपत्रे, प्रमाणपत्रे, बिले, पेमेंट पावती आणि सूचना व्हॉट्सॲपद्वारे सहज उपलब्ध होणार आहेत. या नवीन एआय-आधारित प्लॅटफॉर्ममुळे नागरिकांचे जीवन अधिक सुलभ होणार असल्याची शक्यता आहे.

"व्हॉट्सॲपद्वारे थेट नागरिकांच्या हातात सेवा आणत आहोत"

माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी या उपक्रमाची माहिती देताना सांगितले, "आम्ही पारंपरिक पद्धतीतून 'गोवा ऑनलाइन' नावाच्या वेब-आधारित प्लॅटफॉर्मवर गेलो, त्यानंतर 'ग्रामीण मित्र' या नावाने घरोघरी सेवा पुरवली आणि आता व्हॉट्सॲपद्वारे थेट नागरिकांच्या हातात सेवा आणत आहोत."

"गोव्याची व्हॉट्सॲप-आधारित सेवा प्रशासनाला खऱ्या अर्थाने नागरिक-केंद्रित आणि सहज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. विविध सेवांमध्ये वापरकर्त्यांना मदत करण्यासाठी सरकार कीवर्ड-आधारित प्रणाली देण्याचा प्रयत्न करत आहे. या एकत्रीकरणामुळे, 'गोवा ऑनलाइन' वापरकर्ते त्यांच्या अर्जांची स्थिती तपासू शकतात, देय तारखेची स्मरणपत्रे मिळवू शकतात, सेवा आवश्यकतेत प्रवेश करू शकतात आणि व्हॉट्सॲपद्वारे सर्व २४१ सेवांसाठी अर्ज करू शकतात," असे खंवटे यांनी स्पष्ट केले.

या नवीन सुविधेमुळे नागरिकांना सरकारी कामांसाठी लागणारा वेळ आणि श्रम वाचणार आहेत. तसेच, सरकारी सेवा अधिक पारदर्शक आणि सुलभ होतील. या उपक्रमामुळे गोव्यातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT