DA Dainik Gomantak
गोवा

Dearness Allowance: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, सरकारकडून महागाई भत्त्यात वाढ

42 टक्क्यांवर असलेला डीए आता 46 टक्क्यांवर आणला आहे

Ganeshprasad Gogate

Dearness Allowance राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांकरिता महत्वाची बातमी समोर येतेय. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आज राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशात 1 जुलै 2023 पासून महागाई भत्ता जाहीर केला असून तो 4 टक्क्यांनी वाढला आहे.

विशेष म्हणजे 42 टक्क्यांवर असलेला डीए आता 46 टक्क्यांवर आणला आहे. तसेच ही रक्कम बेसिक पेमध्ये समाविष्ट होणार असल्याचेही समजतेय.

केंद्र सरकारने 20 ऑक्टोबर रोजी डीए वाढीचा आदेश काढला होता. त्यानंतर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करण्याचा सरकारने विचार केला होता. त्या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली असून सुमारे 60 हजार सरकारी कर्मचाऱ्यांना या डीए वाढीचा लाभ होणार आहे.

थोडक्यात सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी आनंदाची जाणार आहे. महागाई भत्त्यातील वाढ ही 1 जुलैपासून मिळणार आहे. म्हणजेच गेल्या चार महिन्यांची थकबाकी नोव्हेंबरच्या वेतनात जमा होणार असल्याचे वित्त खात्याचे अवर सचिव नरेश गावडे यांनी सांगितलेआहे.

तसेच राज्य सरकारचे कर्मचारी आणि सरकारी अनुदानित शिक्षण संस्थांमधील जे सरकारच्या वेतन नियमानुसार पगार घेतात त्यांच्या डीएमध्ये ही वाढ आहे.

Notice

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT