CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

राज्यात आधुनिक क्रीडा सुविधांसाठी सरकार कटिबद्ध, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही; युवा क्रीडापटूंना संधी देण्यावर भर

Goa CM Pramod Sawant: राज्यात आपले सरकार अत्याधुनिक क्रीडा सुविधा विकसित करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी दिली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यात आपले सरकार अत्याधुनिक क्रीडा सुविधा विकसित करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी दिली. राज्यात होणाऱ्या फिडे विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेचे बोधचिन्ह आणि गीत सादरीकरण समारंभात ते बोलत होते.

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, की राज्यातील क्रीडा प्रशिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच राज्यभरातील युवा क्रीडापटूंना व्यापक संधी देण्याच्या उद्देशाने राज्य सरकार क्रीडा सुविधा विकसित करण्यासाठी कटिबद्ध आहे.

बुद्धिबळ खेळाचा गौरव करताना मुख्यमंत्री म्हणाले, की गोवा राज्य जरी येथील समुद्रकिनारे आणि संस्कृतीसाठी ओळखले जात असले, तरी शैक्षणिक पातळीवर राज्य सध्या प्रगती साधताना दिसत आहे. त्या अनुषंगाने बुद्धिबळाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश केला जात आहे.

कारण, या खेळाद्वारे युवा बुद्धिमत्तेला अधिक धार येणार असून आत्मविश्वास प्रबळ होईल, तसेच व्यूहरचनात्मक वैचारिकतेला खतपाणी मिळणार आहे. हल्लीच्या काळात राज्यात बुद्धिबळ संस्कृती विकसित झालेली आहे. राज्यातील युवा बुद्धिबळपटू राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळविताना दिसत आहेत. राज्यातील बुद्धिबळपटूंची प्रगती निश्चितच भूषणावह आहे.

यापूर्वी २००२ मध्ये गोव्यात जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा झाली होती. त्यानंतर २३ वर्षांनंतर राज्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठी स्पर्धा होत आहे. भारतातही २३ वर्षांनंतर फिडे विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धा होत आहे. २००२ साली हैदराबाद येथे विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धा झाली होती व तेव्हा भारताचा महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद विजेता ठरला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पर्जन्‍यराजा कोपला! पावसाच्या कहरामुळे शेतकरी अस्वस्थ; भाताची कणसे आडवी, कापणी यंत्र नसल्याने वाढल्या समस्या

Narakasur: नरकासूर जळाला, तरी गोवावासीयांना देतोय त्रास; अपघातांचा धोकाही वाढला

पोर्तुगीज फुटबॉलपटूसोबत सेल्फीचा मोह भोवला, केरळच्या फॅनला गोव्यात तुरुंगात काढावी लागली रात्र; FC Goa ला होऊ शकतो 8 लाखांचा दंड

Narkasur: श्रीकृष्णाऐवजी 'नरकासुराचाच' उदो उदो का होतोय?

Prashanti Talpankar: गोव्याच्या 'प्रशांती'ची भरारी! IFFSA टोरंटो येथे ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, Video

SCROLL FOR NEXT