Rama Kankonkar Attack Case Dainik Gomantak
गोवा

Rama Kankonkar Attack Case: जेनिटो कार्दोजच्या अडचणींत वाढ, जामिनाविरोधात आता राज्य सरकारही उच्च न्यायालयात

Rama Kankonkar case: करंझाळे येथील रामा काणकोणकर यांच्यावरील जीवघेण्या हल्ला प्रकरणातील मुख्य संशयित जेनिटो कार्दोज याच्या अडचणींत आता आणखी वाढ झाली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: करंझाळे येथील रामा काणकोणकर यांच्यावरील जीवघेण्या हल्ला प्रकरणातील मुख्य संशयित जेनिटो कार्दोज याच्या अडचणींत आता आणखी वाढ झाली आहे. यापूर्वी पीडित रामा काणकोणकर यांनी जेनिटोच्या जामिनाला उच्च न्यायालयात आव्हान दिले असतानाच, आता राज्य सरकारनेही त्याच्या जामिनाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेतली आहे. या दोन्ही याचिकांवर आता २६ फेब्रुवारी २०२६ रोजी एकत्रित सुनावणी होणार आहे.

सप्टेंबर २०२५ मध्ये करंझाळे येथे रामा काणकोणकर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्याचा कट जेनिटो कार्दोज याने आपल्या साथीदारांच्या मदतीने रचल्याचा आरोप पोलिस तपासात करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपपत्रदेखील दाखल केले असून, अनेक संशयितांपैकी केवळ जेनिटो कार्दोज यालाच सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता.

सत्र न्यायालयाने दिलेल्या या जामीन निर्णयाला दोन स्तरांवर विरोध होत आहे. रामा काणकोणकर यांनी सुरवातीलाच उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल करून जेनिटोचा जामीन रद्द करण्याची मागणी केली होती. आता गुरुवार, १२ फेब्रुवारी रोजी राज्य सरकारनेही अधिकृतपणे जेनिटोच्या जामिनाला विरोध दर्शवणारी याचिका सादर केली आहे. गुन्ह्याचे गांभीर्य आणि तपासातील कल पाहता त्याला जामीन मिळणे अयोग्य असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

पुढील निर्णयाकडे लक्ष!

या प्रकरणातील इतर संशयित अजूनही कोठडीत असताना केवळ मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या जेनिटोला जामीन मिळाल्याने पीडित पक्षकाराने नाराजी व्यक्त केली होती. आता राज्य सरकारनेही या लढ्यात उडी घेतल्याने जेनिटोला पुन्हा एकदा तुरुंगाची हवा खावी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खंडपीठाच्या २६ फेब्रुवारीच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: दुर्गंधीयुक्त मळीमुळे मिरची शेती धोक्यात, खालवडे-काणकोण येथे ओहोळाच्या पाण्यासह शेतजमीनही प्रदूषित

Ishan Kishan: ईशान किशनने धोनीचा रेकॉर्ड मोडत रचला इतिहास, आतापर्यंत 'ही' गोष्ट कोणालाच करता आली नाही

F4 Indian Championship Racing: मोपा येथे शनिवारपासून 'फॉर्म्युला फोर' रेस; CM प्रमोद सावंतांनी रेसिंग ट्रॅक, कारची केली पाहणी

आदिवासी सब प्‍लानमधील निधीचा 25 सरकारी खात्‍यांकडून गैरवापर! यापुढे खात्‍याच्‍या परवानगीनेच वापरावे लागणार अनुदान

13 February 2026 Horoscope: विजया एकादशीचा शुभ मुहूर्त: 'या' राशींना बक्कळ पैसे मिळणार, प्रेमसंबंधही सुधारणार

SCROLL FOR NEXT