Goa cab aggregators policy Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi: 'ॲग्रिकेटर्स नियमावली' विरोधात टॅक्सीचालक आक्रमक! पोलिस स्थानकावर दिली धडक; कांदोळकरांनी दर्शविला पाठिंबा

Goa cab aggregators policy: सरकारकडून राज्यात कॅब ॲग्रिकेटर्स नियमावली सुरू करण्याच्या निर्णयाविरोधात स्थानिक टुरिस्ट टॅक्सी चालक तसेच मालकांनी आज आक्रोश केला.

Sameer Panditrao

कळंगुट: सरकारकडून राज्यात कॅब ॲग्रिकेटर्स नियमावली सुरू करण्याच्या निर्णयाविरोधात स्थानिक टुरिस्ट टॅक्सी चालक तसेच मालकांनी आक्रोश केला. या नियमावलीचा विरोध करत त्यांनी हणजूण पोलिस स्थानकावर धडक दिली. तेथे पालिसांनी त्यांना गेटवरच अडवले. यामुळे वातावरण तंग झाले.

सरकारकडून हजारो स्थानिक टॅक्सीचालकांना खासगी कंपन्यांच्या गुलामगिरीखाली आणण्याचा घाट घातला जात आहे. मात्र, स्थानिक टुरिस्ट टॅक्सी चालक तसेच मालक सरकारचा हा डाव पूर्ण ताकदिनिशी उधळून लावणार असल्याचा इशारा टॅक्सी चालक संघटनेचे नेते योगेश गोवेकर यांनी हणजुणात दिला.

दरम्यान, योगेश गोवेकर यांना अटक होणार असल्याची अफवा पसरल्यानेही टुरिस्ट टॅक्सीचालक आक्रमक बनले. यावेळी शिवोली कॉंग्रेस गट समितीच्या अध्यक्ष पार्वती नागवेकर, कपिल कोरगावकर तसेच अन्य पदाधिकारी टॅक्सी चालकांसमवेत हणजूण पोलिस स्थानकात उपस्थित होते.

किरण कांदोळकरांनी दर्शविला पाठिंबा

गोव्यातील स्थानिक टॅक्सी चालक आणि मालकांनी ॲपआधारित टॅक्सी सेवा (अ‍ॅग्रिकेटर) विरोधात आपली भूमिका स्पष्ट केली असून त्यांनी माजी आमदार किरण कांदोळकर यांची भेट घेतली. टॅक्सी व्यवसाय गोमंतकीयांच्या हातातच राहावा आणि बाहेरच्या कंपन्यांना प्रवेश दिला जाऊ नये, या मागणीला कांदोळकर यांनीदेखील आपला पाठिंबा दर्शविला. दरम्यान, सरकारने हा व्यवसाय बाहेरच्यांच्या हातात देऊ नये, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.

टॅक्सीचालकांना पोलिसांनी रोखले

हणजूण पोलिस स्थानक इमारत परिसरात मोठ्या संख्येने जमलेल्या टॅक्सीचालकांना येथील मुख्य दरवाजाकडेच पोलिसांनी अडवून ठेवले होते. हणजूणचे पोलिस निरीक्षक सूरज गावस यांनी स्वतः गेटपाशी येत टॅक्सीचालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला व आंदोलनकर्त्या पाच प्रमुख नेत्यांना बोलावून आपल्या केबिनमध्ये त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात टॅक्सीचालक ठाण मांडून होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT