Goa Budget 2025 Dainik Gomantak
गोवा

Goa Budget 2025: अर्थसंकल्प सादरीकरणावेळी विरोधकांची मुस्कटदाबी, लेखानुदान मंजुरी आणि सभापतींचे समारोपाचे भाषणही गदारोळातच

Goa Budget: गदारोळातच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे विधेयक मांडण्यासाठी परवानगी मागितली. विधेयक सादर केले, विधेयक विचारात घेण्याची विनंती केली आणि विधेयक मंजूर करण्यासाठी सादर केले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पाच महिन्यांचे लेखानुदान राज्य सरकारने आज विधानसभेत मंजूर करून घेतले. मात्र, या विधेयकावर बोलू दिले नाही म्हणून विरोधी आमदारांनी सभापतींसमोरील हौद्यात धाव घेत जोरदार घोषणाबाजी केली.

या गदारोळातच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे विधेयक मांडण्यासाठी परवानगी मागितली. विधेयक सादर केले, विधेयक विचारात घेण्याची विनंती केली आणि विधेयक मंजूर करण्यासाठी सादर केले. हे सारे होत असताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार विजय सरदेसाई यांनी, आम्हाला यावर बोलायचे आहे, असे सांगितले.

सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी त्यांना एकेक मिनिटात बोलण्यास देता येईल, अशी भूमिका घेतली. नंतर मात्र त्यांनी थेट विधेयक विचारात घेण्याची विनंती केली. विरोधी पक्षनेत्याला कधीही बोलण्याचा अधिकार असतो, याची आठवण आलेमाव यांनी करून दिली.

मात्र, सभापतींनी पुढील कामकाज पुकारणे सुरूच ठेवले. त्यावेळी सरदेसाई यांनी सभापतींच्या हौद्याकडे धाव घेतली. त्यांच्यापाठोपाठ आलेमाव, एल्टन डिकॉस्ता, वेंझी व्हिएगस, क्रुझ सिल्वा आणि वीरेश बोरकरही हौद्याकडे आले. त्याच गदारोळात लेखानुदान मंजूर झाले आणि सभापतींनी समारोपाचे भाषणही सुरू केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CM Pramod Sawant: आंबेडकरांना काँग्रेसकडूनच खोडा, दोनवेळा लोकसभेत जाण्यापासून रोखलं; मुख्यमंत्री सावंतांचा घणाघात

Goa Assembly Budget Session: विधानसभेचे स्थगित अधिवेशन पुन्हा बोलावण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे 'मौन'; राज्यपालांच्या सूचनेनंतरही प्रमोद सावंतांनी विषयावर बोलणे टाळले

मैत्रिणीकडे जाते सांगून निघालेल्या मुलीला फसवून पळवलं, लैंगिक अत्याचार प्रकरणी नराधमाला 10 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा कायम; हायकोर्टाचा मोठा निकाल

मतदानाच्या आदल्या दिवशी फोंडा पोटनिवडणूक रद्द! एक वर्षाचा कार्यकाळ रिक्त पदापासून की निकालापासून?; सुप्रीम कोर्ट करणार 'फैसला'

खरी कुजबुज: युवा काँग्रेस ‘सायलेंट मोड’वर?

SCROLL FOR NEXT