Goa Education Loan: Dainik Gomantak
गोवा

Goa Education Loan: राज्यातील 36 विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी व्याजमुक्त कर्ज

GEDC कडून कर्जाचा लाभ

Akshay Nirmale

Goa Interest Free Education Loan for Students: गोव्यातील एकूण 36 विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षणासाठी व्याजमुक्त कर्ज देण्यात आले आहे. राज्य सरकारच्या गोवा एज्युकेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (GEDC) मार्फत हे कर्ज वितरित केले जाते.

मुख्यतः ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड, युनायटेड किंगडम आणि यूएसए मध्ये सन 2019-20 ते 2021-22 या तीन वर्षांत उच्च शिक्षणासाठी हे कर्ज असणार आहे. परदेशात पदवी मिळवण्यासाठी कर्जाची रक्कम रु 8 लाख इतकी आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी हे बिनव्याजी कर्ज राज्य आणि देशात पदवी शिक्षणासाठी घेतले होते, त्यांनी अभियांत्रिकी, नर्सिंग आणि हॉस्पिटॅलिटी स्ट्रीममध्ये पदवी मिळवण्यासाठी हे कर्ज घेतले आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडेच शिक्षण खाते आहे. त्यांनी गोवा विधानसभेत ही माहिती दिली होती. दरम्यान, 2019-20 मध्ये कर्ज घेतलेल्या एकूण 661 पैकी केवळ 118 जणांनी आजपर्यंत सर्व हप्ते फेडले आहेत.

पुढील वर्षी (2020-21) मध्ये कर्ज घेतलेल्या 476 पैकी फक्त तीन विद्यार्थ्यांनी नियमितपणे हप्ते भरले आहेत, तर 2021-22 मध्ये कर्ज घेतलेले 324 अद्याप परतफेडीच्या स्थगित कालावधीत आहेत.

2019-20 मध्ये, सोळा विद्यार्थ्यांनी परदेशी अभ्यासासाठी 8 लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि पुढील वर्षी हा आकडा मोठ्या प्रमाणात घसरून फक्त चार वर आला. कोविड-19 साथीच्या आजारामुळे इमिग्रेशनला फटका बसला होता.

2021-22 मध्ये, परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी कर्ज घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पुन्हा 16 वर गेली. परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे व्याजमुक्त कर्ज घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा खूप जास्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Carambolim: 'गरीब अडचणीत येतील, गावाचा विनाश होईल'! करमळीत ‘मेगा प्रोजेक्ट’ला विरोध; ग्रामसभेत ठराव

Cyber Crime: ऑनलाईन गंडा; गोवेकरांचे 73 लाख पाण्‍यात! आर्थिक फसवणुकीच्‍या 903 घटना घडल्‍या

Goa Crime: 'तुमच्यासाठी पार्सल आहे' म्हणून बाहेर बोलावले, साखळी हिसकावून पळाला; गुजरातच्या कुख्यात चोरट्याला अटक

Verna Accident: मद्यपी चालकाचा ताबा सुटला, दुचाकीवरून दोघे फेकले गेले; वेर्णा येथील अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Chandra Grahan: 2025 मधलं भारतातलं पहिलं आणि अंतिम चंद्रग्रहण; कधी आणि कुठे दिसेल जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT