Panjim city Dainik Gomantak
गोवा

पणजीला एप्रिलपर्यंत स्मार्ट शहर बनवण्यासाठी सरकारचे प्रयत्न

आचारसंहितेमुळे परवानग्या रखडल्याने प्रकल्प उशिराने, बाबूश मोन्सेरात यांचाही आक्षेप

दैनिक गोमन्तक

पणजी : पणजीला स्मार्ट सिटी कऱण्यासाठी गोवा सरकारने आता कंबर कसली आहे. 180 कोटी रुपये खर्चून पणजीला स्मार्ट करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत स्मार्ट सिटीच्या काम पूर्ण होणार आहे. गोवा इंटेलिजंट सिटी मॅनेजमेंट सिस्टिमच्या माध्यमातून पणजीला स्मार्ट बनवलं जात आहे. याचं कमांड आणि कंट्रोल सेंटर पणजीतील अल्तिन्हो भागात असून स्थानिकांच्या विरोधासह इंटरनेट प्रोव्हायडरसाठीच्या निविदेमुळे काम रखडल्याचं बोललं जात आहे. (Smart City Panjim News Updates)

लार्सन आणि टुब्रो कंपनीला यासाठी कंत्राट मिळालं असून जून 2018 पासून आतापर्यंत पणजीत (Panjim) जवळपास 200 स्मार्ट सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पणजीत एकूण 338 कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव आहे. मात्र अजूनही बसवलेल्या कॅमेऱ्यांना कमांड आणि कंट्रोल रुमशी जोडण्यात आलेलं नाही, त्यामुळे हा प्रकल्प एप्रिलपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. सध्या या प्रकल्पाला बँडविड्थची गरज असून दोन सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी बोली लावली होती. मात्र कमी बोली लावणाऱ्या कंपनीने माघार घेतल्याने प्रकल्प रखडल्याचं बोललं जात आहे. तसंच गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Elections) आचारसंहितेमुळे निवडणूक आयोगाने पुन्हा नव्याने टेंडर काढणं गरजेचं होतं. मात्र नुकतीच निवडणूक आयोगाने टेंडर काढण्याच्या प्रक्रियेला परवानगी दिली आहे. आता ही संपूर्ण प्रक्रिया 31 मार्चपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पणजीला स्मार्ट करण्याचा हा प्रकल्प आधीच एक वर्ष उशिराने सुरु आहे. पणजीतील विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांनी काही ठिकाणी हरकत घेतल्यामुळे उशीर होत असल्याची माहिती आहे. तसंच या प्रकल्पातील आणखी एक मोठा अडथळा म्हणजे परवानग्या उशिरा मिळणं. लार्सन अँड टुब्रोला रस्ते खोदून त्याखाली फायबर केबल घालण्यासाठी परवानगी हवी आहे, मात्र रस्त्याखाली आधीच असलेल्या वेगवेगळ्या लाईन्समुळे कामात अडथळा येत असल्याचं बोललं जात आहे. मात्र नवं सरकार (Goa Government) सत्तेत आल्यानंतर कामाला वेग येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. असं असलं तरीही हे काम पूर्ण होण्यास एप्रिल महिन्याच्या मध्यापर्य़ंत वाट पाहावी लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT