Ashok Naik, President of GMSj, along with other office bearers while helping the flood affected families in Khadki, Goa. On Tuesday, 27 July, 2021.  B D Mote / Dainik Gomantak
गोवा

Goa: गोमंतक मराठा समाजातर्फे खडकी येथील पुरग्रस्त कुटुंबांना मदत

सामाजिक बांधिलकी (Social awareness ) जोपासत कडधान्ये, पाणी तसेच औषधे वाटप काण्यात आली (Goa)

दैनिक गोमन्तक

गोमंतक मराठा समाज (Gomantak Maratha Samaj) केंद्रीय समिती आणि सत्तरी (Sattari) तालुका समितीच्या वतीने खडकी (Khadaki) येथील पुरग्रस्त (Flooded) समाज बांधवांना तसेच दलित समाजाच्या कुटुंबांना सामाजिक बांधिलकी जोपासून (Social Awareness) कडधान्य, पाणी तसेच औषधे देऊन मदत करण्यात आली. या ठिकाणांच्या गोमंतक मराठा समाज बांधवांना तसेच दलित समाजाच्या कुटुंबांना दि 23 रोजी पहाटे म्हादई नदीला (Mhadei River Flood) आलेल्या पुराचा तडाखा बसला होता. (Goa)

येथिल गोमंतक मराठा समाज बांधवांच्या घरात पाणी शिरून सर्व समानाची नुकसानी झाली होती, त्याच प्रमाणे शिवाजी नगर येथे राहणाऱ्या दलित समाजाच्या पाच कुटुंबांना याचा फटका बसला होता. यामध्ये दलित समाजाच्या कुटुंबांची घरे जमीनदोस्त झाली होती. या घटनेची दखल घेऊन गोमंतक मराठा समाज समिती सत्तरी, सालसेत तालुका समिती आणि गोमंतक मराठा समाज केंद्रीय समितीच्या संयुक्त विद्यमाने ही मदत वितरीत करण्यात आली, असल्याची माहिती गोमंतक मराठा समाज सत्तरी शाखेचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी दिली.

यावेळी केंद्रीय समितीच्या वतीने लक्ष्मिकांत नाईक, सत्तरी तालुका गोमंतक मराठा समाजाचे खजिनदार संतोष नाईक, तसेच सालसेत तालुका समितीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी सुमारे 20 कुटुंबांना खाण्याचे साहित्य, पाण्याच्या बाटल्या, तसेच औषधे वाटप करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मेष, कर्कसह 'या' 4 भाग्यवान राशींसाठी आजचा दिवस 'गोल्डन' ठरणार! अचानक धनलाभाचे योग आणि करिअरमध्ये प्रगती निश्चित

India vs Pakistan: टीम इंडियाला हरवण्यासाठी पाकड्यांचा 'मास्टरप्लॅन', शोएब अख्तर, म्हणाला, 'त्या' फलंदाजाला 2 ओव्हर्समध्ये आउट करा

रामा काणकोणकर हल्ला प्रकरण; गुंड जेनिटोसह आठ जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Goa Children Court: पोटच्या 20 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप, आठ वर्षानंतर लागला निकाल

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT