Goa Deputy Chief Minister Baburao Azgawkar cheated youth of Pernem by showing them lure of jobs Dainik Gomantak
गोवा

Goa: उपमुख्यमंत्र्यांकडून पेडणेकरांची नोकऱ्यांच्या नावाखाली फसवणुक

पत्रकारांशी बोलतांना पेडणे मतदारसंघात येणाऱ्या आयुष हॉस्पिटल, मोपा विमानतळ, स्पोर्ट्स स्टेडियम या सारख्या प्रकल्पाबाबत ते बोलत होते..

दैनिक गोमन्तक

मोरजी: 2012 च्या निवडणुकांपासून (Elections) पेडणेचे आमदार बाबू आजगावकर आणि भाजपा सरकार मोठ-मोठ्या प्रकल्पांच्या (Project) नावाखाली पेडणेकरांची फसवणूक (fraud) करत आहे, असा आरोप रेव्होलूशनरी गोवन्सने केला आहे. मोपाच्या नावाखाली, पेडणे तालुका पर्यावरण दृष्ट्या संपविण्याचा कट सरकारने साधला आहे असे ते म्हणतात.

हल्लीच स्थानिक आमदार बाबू आजगावकर यांनी पेडण्यात येणाऱ्या प्रकल्पांबाबत बोलतांना, स्थानिकांना नोकरीसाठी प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे . मंगळवारी, पत्रकारांशी बोलतांना पेडणे मतदारसंघात येणाऱ्या आयुष हॉस्पिटल, मोपा विमानतळ, स्पोर्ट्स स्टेडियम या सारख्या प्रकल्पाबाबत ते बोलत होते.

दरम्यान, रेव्होलूशनरी गोवन्सच्या पेडणे तालुका अध्यक्ष सुनयना गावडे यांनी त्यावर जोरदार टीका केली असून, त्या म्हणाल्या की बाबू आजगावकर यांनी पेडणेकरांना फसवणे बंद करावे. हे प्रकल्प 2012 तील निवडणुकीपासून लोकांना नोकरीचे गाजर दाखवण्यासाठी वापरले जात आहेत. दहा वर्ष पूर्ण होत आली तरी स्थानिकांना या नोकर्यांसाठी गरजेचे असलेले शिक्षण दिले जात नाही. मोपा येथे बांधकामासाठी लागणारे मनुष्यबळ आणी मशीनरी सुध्दा बाहेरून मागवली जाते. त्यामुळे हे प्रकल्प म्हणजे सरकारची लोकांचे पैसे वाया घालवण्याची युक्तीच आहे असेही त्या म्हणाल्या.

रेव्होलूशनरी गोवन्सचे अध्यक्ष मनोज परब यांनी यातल्या किती नोकऱ्या मूळ गोवेकराला मिळतील असा प्रश्न केला आहे. भाजपा आणी काँग्रेस सरकार मिळून गोव्याचा सर्वनाश करत आहेत असा दावा त्यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT