Salcete Accident Case Dainik Gomantak
गोवा

Salcete Accident Case: माझ्या अपघातग्रस्त मुलाला न्याय द्या ! दीपिका कुंकळकर

Salcete Accident Case: १७ दिवसांनंतरही मुंगूल अपघाताचा दोषी मोकाटच

गोमन्तक डिजिटल टीम

Salcete Accident Case

सासष्टी, १ मे २०२४ रोजी सकाळी साईश कुंकळकर याला मुंगूल येथे अपघात झाल्याने त्याची स्थिती गंभीर झाली होती. त्याच्यावर गोवा वैद्यकीय इस्पितळात ९ तास शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

मात्र अजून तो दुखापतीतून पूर्ण सावरलेला नाही, असे त्याची आई दीपिका कुंकळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

अपघाताला १७ दिवस उलटले तरी पोलिसांना अजूनही अपराधी सापडलेला नाही, असे त्याच्या आईचे म्हणणे आहे.

अपराध्याचा ठावठिकाणा लागत नाही तसेच स्थानिक काहीही सांगण्यास नकार देत असल्याने तपास करणे कठीण जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे असल्याचे अपघातग्रस्त मुलाच्या आईने आज मडगावात पत्रकारांना सांगितले.

आपला मुलगा कोलवा येथील पेट्रोल पंपवर नोकरीला होता. जेव्हा अपघात झाला तेव्हा आपण व छोटा मुलगा कामावर होती. कोणी तरी त्याला इस्पितळात पोहोचविला. चौकशीच्या मागणीसाठी दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक व उपअधीक्षकांना निवेदन दिल्याचे कुंकळकर यांनी सांगितले.

अपराध्याला कडक शिक्षा व्हावी!

सध्या आपल्या मुलाची स्थिती सुधारत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, खासगीत बोलताना परिस्थिती गंभीर असल्याचे ते सांगतात. पती काम नसल्याने घरीच असल्यामुळे आमची परिस्थिती हलाखीची आहे. या अपघाताचा तपास करून अपराध्याला कठोर शिक्षा करून आपल्या मुलाला न्याय द्यावा, असे आपण पोलिस अधिकाऱ्यांना सांगिले आहे,असे दीपिका कुंकळकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'मतदारांना विचारूनच भाजपमध्ये आलो'; निलेश काब्राल यांच्या टीकेला रोहन खंवटे यांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

IND vs AUS: गोव्याच्या 18 वर्षीय व्यंकटचे युवा वनडे पदार्पण दिमाखात; ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या विजयात घेतली कर्णधाराची महत्त्वाची विकेट

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'चा जबर दणका! पाक एअरफोर्सचा एअरबेस अजूनही कोमात; सॅटेलाइट कॅमेऱ्यानं पकडली पाकड्यांची चोरी

CCTV Mandatory in medical: औषध दुकानांवर आता सीसीटीव्हीची नजर! H, H-1 आणि X औषधांच्या विक्रीवर नियंत्रणासाठी केंद्राचा मोठा प्रस्ताव

Porvorim Elevated Road: पर्वरी उन्नत मार्गावर अपघात, पाणी साचण्याच्या समस्येवर 'आप'चा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT