Dr. Shekhar Salkar Dainik Gomantak
गोवा

Goa Smoking Addiction: गोव्यात मुलांपेक्षा मुलींमध्ये धूम्रपानाचे प्रमाण अधिक, ग्रामीण भागात युवक गुटख्याच्या आहारी

Goa Smoking Addiction: अंमलीपदार्थांकडे वळण्याची पहिली पायरी; पालक चिंतेत

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Smoking Addiction

गोव्यात तंबाखू सेवनाचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे. परंतु मागील काही वर्षांत राज्यात मुलांपेक्षा मुलींमध्ये धूम्रपान करण्‍याचे प्रमाण वाढले आहे. तर, ग्रामीण भागातील युवकांमध्ये गुटखा खाण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

गोव्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत १० टक्क्यांहून कमी लोक तंबाखूचे सेवन करतात, असे कर्करोगतज्ज्ञ डॉ. शेखर साळकर यांनी सांगितले.

राज्यात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी आहे. तरीसुद्धा बेकायदा विक्री सुरू आहे. अशांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. मुलांना आपण तंबाखू, धूम्रपानापासून दूर ठेवू शकलो तर इतर समस्या उद्भवणार नाहीत.

धूम्रपान ही अमलीपदार्थांकडे वळण्याची पहिली पायरी आहे. त्यामुळे तंबाखूचे व्यसन एकदा लागले की ते सोडणे कठीण होऊन बसते. म्‍हणूनच या व्यसनापासून अगोदरच दोन हात दूर राहिलेले बरे, असे साळकर यांनी सांगितले.

दरवर्षी ३० लाख लोकांचा मृत्‍यू : डॉ. देसाई

तंबाखू नियंत्रण, गोवा आरोग्य संचालनालयाचे नोडल अधिकारी डॉ. मोहनराव देसाई यांनी सांगितले की, २०१६ साली झालेल्या सर्व्हेक्षणानुसार राज्यात तंबाखू सेवनाचे प्रमाण ९.७ टक्के तर धूम्रपानाचे प्रमाण ४.२ टक्के आहे. देशात दरवर्षी तंबाखू सेवनामुळे सुमारे ३० लाख लोकांना आपला जीव गमवावा लागतो.

तोंडाचा व फुफुसाचा कर्करोग होण्याची भीती अधिक असते. संबंधित कोणीही विरोध केला नाही. काहींनी त्यांच्या शंका उपस्थित केल्या, त्यावर उत्तर त्यांचे समाधान करण्यात आले. यंदा इयत्ता नववीपासून नवे शैक्षणिक धोरण अंमलात येत आहे. त्‍यासोबतच राष्‍ट्रीय आराखड्यानुसार प्रत्‍येक वर्गाचा कालावधी ५० मिनिटांचा असणे अपेक्षित आहे.

त्‍यासाठी खात्‍याकडून शिक्षकांना खास सूचना करण्‍यात आल्‍या आहेत. सध्‍या ३५ मिनिटांची एक तासिका आहे. या पार्श्वभूमीवर आता ४० मिनिटांची तासिका होणार आहे.

यंदा केवळ नववी इयत्तेसाठी नवी नियमावली लागू होईल. शाळेची एकूण १५ मिनिटे वाढतील. त्‍यासंदर्भात शिक्षकांचे सहकार्य मिळावे, यासाठी शिक्षण खात्‍याने विशेष बैठक घेतली. त्‍यात काही शिक्षकांनी कामाचा ताण वाढेल, असा मुद्दा उपस्‍थित केला.

परंतु नवे धोरण अमलात आणताना प्रत्‍येकाने सहकार्य करणे अपेक्षित असून, आवश्‍‍यक तेथे अधिक संख्‍येने शिक्षक उपलब्‍ध करून देण्‍यात येतील, असे वरिष्‍ठ पातळीवरून सांगण्‍यात आले आहे. त्‍यामुळे नववीचे वर्ग अधिक वेळ चालतील. त्‍यासाठी सकाळी ८ ऐवजी ७.४५ वाजता किंवा सायंकाळी अधिक तास घ्‍यावा लागणार आहे. यासंदर्भात शाळांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.

सर्व्हेक्षण काय दर्शवते?

तंबाखू सेवन प्रमाण 9.7 टक्के

धूम्रपानाचे प्रमाण 4.2 टक्के

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT