Goa's Top News: गोवा पोलिसांचे ऑपरेशन 'राखण', अपघात; राज्यातील ठळक बातम्या

Goa Today's 29 May 2024 Breaking News In Marathi: गोव्यात दिवसभर घडणाऱ्या विविध घडामोडींच्या ताज्या अपडेट.
Goa Police Rakhand Operation
Goa Police Rakhand OperationDainik Gomantak

सेंट फ्रान्सिस झेवियर अपमान प्रकरणी अभिषेक बॅनर्जी विरुद्ध गुन्हा

गोव्यातील ख्रिस्ती समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर समाज माध्यमावर टाकल्याबद्दल कोलवा पोलीसांनी अभिषेक बॅनर्जी याच्या विरोधात एफआयआर नोंद केली आहे.

बॅनर्जी याच्या विरोधात तियात्रीस्त मायकल ग्रासियस यांनी तक्रार नोंदवली होती. या प्रकरणात बॅनर्जी विरुद्ध भादंसच्या २९८ व २९५ (अ) कलमाखाली आज गून्हा नोंद केला.

बॅनर्जी हा पश्चिम बंगाल स्थित इसम असून त्याने सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या विरोधात फेसबूकवर आक्षेपार्ह मजकूर प्रदर्शित केला होता. त्याच्या विरोधात गोव्यात कोलवा, फातोर्डा आणि मायणा कुडतरी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

गोवा पोलिसांचे ऑपरेशन 'राखण'

रात्रीच्या वेळेस रस्त्यावर घडणारे गुन्हे नियंत्रित करण्यासाठी उत्तर गोवा पोलिसांनी ऑपरेशन राखणच्या माध्यमातून संशयित वाहने आणि लोकांची तपासणी केली.

जुने गोवा पोलीस स्टेशन येथे गुरुवारी सार्वजनिक तक्रार निवारण कार्यक्रम

पोलीस अधीक्षक, पर्वरी आणि एसडीपीओ पणजी यांचा सार्वजनिक तक्रार निवारण कार्यक्रम गुरुवार, 30 जानेवारी 2024 रोजी जुने गोवा पोलीस स्टेशन येथे संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत होणार आहे. काही तक्रारी असल्यास सर्व तक्रारदारांना येथे भेट देण्याची विनंती पोलिसांच्या वतीने करण्यात आली आहे.

कोण होणार गोव्याचे खासदार? 4 जूनला एक वाजता होणार चित्र स्पष्ट

Goa Loksabha Election Result

गोवा लोकसभा निकालाच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज झाली असून, चार जूनला 7 ते 8 फेऱ्यात मतमोजणी होणार. दक्षिण गोव्यात दामोदर कॉलेज तर उत्तर गोव्यात पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये मतमोजणीचे केंद्र. मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांची माहिती.

खोर्ली सीमेर, म्हापसा येथे विहिरीत पडलेल्या वृद्धेला जीवदान

खोर्ली सीमेर, म्हापसा येथे विहिरीत पडलेल्या वृद्धेला म्हापसा अग्निशमन दलाच्या जवानांनी दिले जीवदान. तोल गेल्याने 65 वर्षीय महिला विहिरीत पडली. तिला उपचारासाठी उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात दाखल केले. सध्या ती सुखरूप असल्याचे दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Mapusa- Goa
Mapusa- GoaDainik Gomantak

मार्ना-शिवोलीच्या सरपंचपदी संदेश दिनानाथ हडफडकर बिनविरोध

मार्ना-शिवोलीच्या सरपंचपदी संदेश दिनानाथ हडफडकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Marna - Siolim Panchayat
Marna - Siolim PanchayatDainik Gomantak

दांडो-सांगे येथे पर्यटक कारचा आपघात

Sanguem Accident

दांडो-सांगे येथे पर्यटक कारचा अपघात. सांगेच्या दिशेने जाताना ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती. कारमध्ये चार प्रौढ व एक लहान मुलं होते. लहान मुलाल किरकोळ दुखापत.

Rent A Cab Accident
Rent A Cab AccidentDainik Gomantak

उसगाव तिस्क येथे उघडे चेंबर बंद करण्याची मागणी

उसगाव तिस्क येथे उघड्या चेंबरलवर लाद्या टाकण्याची स्थानिकांची मागणी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com