Rama Kankonkar And Zenito Cardozo Dainik Gomantak
गोवा

गुंड जेनिटोची दिवाळी तुरुंगातच; रामा काणकोणकर हल्लाप्रकरणी सर्व संशयितांना 31 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

Rama Kankonkar attack case: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्लाप्रकरणी जेनिटोसह सात जणांना अटक करण्यात आली आहे.

Pramod Yadav

पणजी: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर हल्लाप्रकरणी गुंड जेनिटो कार्दोझ याच्यासह इतर सात जणांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. मेरशी सत्र न्यायालयाने सर्व संशयितांना ३१ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. संशयितांना दिवाळीपूर्वी न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. काणकोणकर हल्लाप्रकरणी संशयितांना अटक करण्यात आली आहे.

कोर्टात जेनिटोची बाजू मांडतांनी वकिलांनी रामा काणकोणकर आणि जेनिटो कार्दोझ यांच्यात कोणतीही दुष्मनी नसल्याचा दावा करण्यात आला. दरम्यान, जेनिटोला जामीन देणे तपास प्रक्रियेसाठी घातक ठरेल, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी करत. जेनिटोला जामीन न देण्याची विनंती करण्यात आली.

शुक्रवारी झालेल्या सुनावणी दरम्यान, जेनिटो कार्दोजच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सत्र न्यायालयात जोरदार युक्तिवाद झाला. पोलिसांनी ‘अटकेचे कारण’ दिले नाही. ‘अटकेचा हेतू म्हणजे अटक का करायची हे स्पष्ट करणे गरजेचे असतो; परंतु तो हेतू देखील स्पष्ट करण्यात आला नाही.

मोबाईल फोन फॉरमॅट केल्याबद्दल भारतीय न्याय संहिता कलम २३८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि तो जामिनपात्र गुन्हा आहे,’ असेही जेनिटोतर्फे न्यायालयात नमूद करण्यात आले.

या गुन्ह्याशी जेनिटोचा काहीही संबंध नाही आणि त्याच्या अटकेची प्रक्रिया पूर्णपणे बेकायदेशीर आहे, असे जेनिटोतर्फे वकिलांनी स्पष्ट केले. स्वतःचा बचाव करताना कार्दोजनी आपल्या अटकेची वैधता आणि तपास प्रक्रियेलाच आव्हान केले. मी घटनास्थळी नव्हतो, असे स्‍पष्‍ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: जाब विचारण्याची किंमत जीवाने! चिखली-कोलवाळ येथे मद्यधुंद युवकांकडून खून; नातेवाईकांनाही बेदम मारहाण

NCERT चा मोठा निर्णय! 9 वीच्या पुस्तकात आता 'आणीबाणी'ची एन्ट्री; पहिल्यांदाच विद्यार्थी शिकणार 1975 चा इतिहास

Goa Tourism Projects: 'टाऊन स्क्वेअर'ची मंत्र्यांकडून पाहणी, पर्यटन विकासासाठी केंद्राच्या सहकार्याची ग्वाही

Sao Joao Festival Celebration: रिमझिम पावसात फुलला 'सांजाव'

सरकारी आणि खासगी क्षेत्रात नोकरीची मोठी संधी! फोंड्यात सॅनिटरी निरीक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू; ४० जागा उपलब्ध!

SCROLL FOR NEXT