Ganesh Idol Dainik Gomantak
गोवा

Ganesh Idol: गणेशोत्सवाआधी मोठा खुलासा! गोव्यात गणेशमूर्तींत प्लास्टर ऑफ पॅरिसचा उघड वापर; 5 नमुने मर्यादेपेक्षा अधिक

Goa Ganesh idols plaster of Paris: गणेश चतुर्थी अवघ्या सहा दिवसांवर आली असताना गोव्याच्या बाजारपेठेत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती दाखल झाल्याचे गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तपासणीत उघड झाले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

अवित बगळे

पणजी: गणेश चतुर्थी अवघ्या सहा दिवसांवर आली असताना गोव्याच्या बाजारपेठेत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती दाखल झाल्याचे गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तपासणीत उघड झाले आहे.

मंडळाने केलेल्या संयुक्त पाहणीदरम्यान तपासणीसाठी घेण्यात आलेल्या सुमारे ३१५ गणेशमूर्तींच्या नमुन्यांपैकी आतापर्यंत १८५ नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली असून, त्यातील पाच नमुन्यांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसचे प्रमाण निर्धारित २० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे आढळले आहे. त्यामुळे संबंधित मूर्तिकार, कारागीर किंवा विक्रेत्यांवर पर्यावरण खात्याच्या निर्देशांनुसार दंडात्मक कारवाई होणार आहे.

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरण, हवामान बदल व हवामान विभागाने जारी केलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने ही कारवाई हाती घेतली आहे. मूर्तिकार, मूर्ती तयार करणारे कारागीर आणि पोर्टलवर नोंदणीकृत विक्रेत्यांच्या ठिकाणी १७ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित उपविभागीय दंडाधिकारी, गोवा हस्तकला, ग्रामीण व लघुउद्योग विकास महामंडळाचे अधिकारी यांच्यासह पाहणी केली आणि नमुन घेतले होते.

या पाहणीदरम्यान मूर्तींचे नमुने घेऊन त्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. आतापर्यंत सुमारे ३१५ नमुने गोळा करण्यात आले असून, त्यापैकी १८५ नमुन्यांचे विश्लेषण पूर्ण झाले आहे. उर्वरित नमुने तपासणीच्या विविध टप्प्यांवर आहेत. तपासणी पूर्ण झालेल्या नमुन्यांपैकी १८० नमुन्यांमध्ये निर्धारित मर्यादेचे पालन झाल्याचे दिसून आले; मात्र पाच नमुन्यांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा अधिक आढळल्याने संबंधित मूर्ती विक्रेत्यांवर दंड आकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, गणेशोत्सवासाठी मूर्तींची खरेदी सुरू होण्याच्या काही दिवस आधीच मंडळाच्या तपासणीत नियमभंगाची प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे उर्वरित सुमारे १३० नमुन्यांच्या तपासणीचे निष्कर्ष काय येतात, याकडे आता लक्ष लागले आहे. त्यातून आणखी किती मूर्ती निर्धारित निकषांमध्ये बसत नाहीत, हे स्पष्ट होणार आहे.

मोहिमेच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह

निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक प्लास्टर ऑफ पॅरिस आढळलेल्या पाच नमुन्यांशी संबंधित कारागीर किंवा विक्रेत्यांवर पर्यावरण खात्याच्या निर्देशांनुसार दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे गणेशमूर्ती तयार करणाऱ्या तसेच विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात येत आहे. मात्र, गणेश चतुर्थी तोंडावर असताना नियमबाह्य मूर्ती बाजारात पोहोचल्याने दोषींवर कारवाई होणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Asian Games: भारत अन् आशियाई पदकं; अंतिम क्षणी का चुकतो 'सुवर्ण' निशाणा? क्रीडा संस्कृतीत बदलाची गरज

Kendra Drishti Yoga 2026: करिअरमध्ये येणार सोन्याचे दिवस! केंद्र दृष्टी योग 'या' राशींना करणार मालामाल; 2 ऑक्टोबरपासून मिळणार अफाट यश

IT ची हाय-फाय नोकरी सोडली, बंगळुरुत चालवते रॅपिडो ऑटो, कॉर्पोरेट नोकरीपेक्षा कमावते जास्त पैसे; आईसाठी तरुणीनं उचललं मोठं पाऊल

पाकिस्तानात सुरक्षेची ऐशीतैशी! दरोडेखोरांनी थेट खेळाडूंच्या बसलाच केलं टार्गेट; बंदुकीचा धाक दाखवत पैशांची मागणी अन् मारहाण

Goa Paddy Farming: पावसाने आणखी दडी मारली तर भातशेती धोक्यात; कणसे धरण्याच्या काळात कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT