Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: भेटींचा उत्सव, मतांचा ध्यास! गणेश चतुर्थीत राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींना उधाण; दर्शनासोबत निवडणुकीच्या समीकरणांचीही चर्चा

Goa Political Meetings During Ganesh Chaturthi,: विधानसभा निवडणुकीला अवघे पाच महिने राहिल्याने यंदाची गणेश चतुर्थी राजकीय नेत्यांसाठी दर्शनासोबतच ‘डिप्लोमसी’ची संधी ठरत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: विधानसभा निवडणुकीला अवघे पाच महिने राहिल्याने यंदाची गणेश चतुर्थी राजकीय नेत्यांसाठी दर्शनासोबतच ‘डिप्लोमसी’ची संधी ठरत आहे. गणपती दर्शनाच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधकांच्या घरांमध्ये होणाऱ्या भेटीगाठींमधून बदलती राजकीय समीकरणे, जवळीक आणि आगामी निवडणुकीच्या सुप्त हालचालींचे संकेत मिळू लागले आहेत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या निवासस्थानी भाजप नेत्यांसह अन्‍य पक्षांतील नेत्यांचीही ये-जा सुरू आहे. माजी आमदार चर्चिल आलेमाव यांनी नुकतेच सावंत यांच्या घरी गणेश दर्शन घेतले. ‘मिशन फॉर लोकल’चे राजन कोरगावकर यांनीही सावंत यांच्या निवासस्थानी भेट दिली. गोवा फॉरवर्ड आणि आम आदमी पक्षाची ‘गोवा फर्स्ट’ आघाडी झाल्यानंतर विजय सरदेसाई यांच्या सावईवेरे येथील निवासस्थानी अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या नेत्यांनी गणेश दर्शन घेतले.

काँग्रेसमध्ये असूनही पक्षाच्या सध्याच्या नेतृत्वापासून काहीसे दुरावलेले अमित पाटकर यांच्या निवासस्थानी सरदेसाई यांनी दिलेली भेटही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. दरम्यान, अनेक मतदारसंघांत विद्यमान तसेच मागील निवडणुकीत पराभूत झालेल्या नेत्यांकडून मतदारांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छांसह भेटवस्तू दिल्या जात आहेत. त्यामुळे उत्सवाच्या निमित्ताने मतदारांशी संपर्क वाढविण्याची लगबग सुरू झाली आहे.

फातोर्ड्यात काँग्रेसचा उमेदवार उतरणार

जीएफपी-आप यांच्यात युती झाल्यानंतर काँग्रेसने फातोर्ड्यात स्वतंत्र उमेदवार देण्याचे स्पष्ट केले आहे. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पक्ष पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे सांगितले. त्यामुळे फातोर्ड्यात पुढे काय होते, हे औत्सुक्यपूर्ण ठरणार आहे.

भाजपच काँग्रेसयुक्त : नीलेश काब्राल यांचा घणाघात

१ भाजपचे ज्येष्ठ आमदार नीलेश काब्राल यांनी पुन्हा उमेदवारी मिळाली तरी ती स्वीकारायची की नाही, याचा विचार करावा लागेल, असे सूचक विधान नुकतेच एका मुलाखतीत केले. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्यांना मंत्रिपदे मिळाली; परंतु जुन्या निष्ठावंतांना डावलले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ‘काँग्रेसमुक्त भारत’ करण्याची घोषणा झाली होती; परंतु भाजपच काँग्रेसयुक्त झाल्याची परिस्थिती आहे, असा टोला त्यांनी लगावला. पक्षाच्या या बदललेल्या राजकीय वाटचालीमुळे जुन्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचेही त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले.

२ मंत्रिपदाची जबाबदारी सोडल्यानंतर पक्षाने आपल्याला कोणतेही महत्त्वाचे पद दिले नसल्याचे काब्राल यांनी सांगितले. २०१२ मध्ये मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली मी आमदार झालो आणि त्यानंतर सलग तीनवेळा भाजपच्या तिकिटावर निवडून आलो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. भाजपमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट करताना काब्राल यांनी, ‘पक्षाने आगामी निवडणुकीत उमेदवारी दिल्यास त्याबाबतचा निर्णय परिस्थिती पाहून घेऊ’, असे संकेत दिले. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याने निवडणुकीपूर्वी भाजपमधील अंतर्गत नाराजी पुन्हा चर्चेत आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT