Ganesh  Dainik Gomantak
गोवा

Ganesh Chaturthi 2023: गावा-गावातील मूर्तीकार गणेशमूर्ती बनविण्यात व्यस्त तर बहुतांश चित्रशाळांतून गणेशमूर्ती तयार!

यंदा अधिक श्रावणामुळे थोडे अधिक दिवस मूर्तीकारांना मिळत आहेत. त्यामुळे बाहेरुन मूर्ती आयात करण्याची गरज भासणार नाही- मूर्तीकार

गोमन्तक डिजिटल टीम

Ganesh Chaturthi 2023 अधिक श्रावण मास सुरू असून भाविकांना चतुर्थीचे वेध लागले आहेत. गावा-गावातील मूर्तीकार गणेशमूर्ती बनविण्यात व्यस्त आहेत. अनेक ठिकाणी गणरायाच्या मूर्ती आकारास येऊ लागल्या आहेत.

काही ठिकाणी बाप्पांच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्यासोबतच मूर्तीचे डोळे, दागिने आदी रंगरंगोटीची कामे सध्या वेगात सुरू असून, त्यासाठी कारागीर झटत आहेत. पेडणेपासून काणकोण, सांगे, सत्तरी, फोंडा, मठग्राम, डिचोलीसह उर्वरित गोव्यात मूर्तीकारांनी बऱ्याच मूर्ती तयार केल्या आहेत.

भाद्रपदातील चतुर्थी म्हणजे एखाद्या कुंभमेळ्याची पर्वणी होय. यंदा अधिक श्रावण महिना असल्यामुळे थोडे अधिक दिवस मूर्तीकारांना मिळत आहेत.

त्यामुळे यंदा अधिक मूर्ती गोव्यातच तयार होत असून बाहेर मूर्ती आयात करण्याची गरज भासणार नाही, असा अंदाज मूर्तीकार व्यक्त करीत आहेत.

पर्यावरण जतनासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती भाविकांनी स्वीकारू नये, असे काही मूर्तीकारांचे मत आहेत.

कुडचडेचे मूर्तीकार दामोदर खांडेकर म्हणाले, आमच्याकडे शुद्ध चिकण मातीच्या मूर्ती आहेत. इतर मोठ्या आकाराच्या मूर्ती या मिश्रमातीतून निर्माण केल्या जातात.

बाहेरून आलेल्या मूर्ती वजनाने कमी होण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर केला जातो. पण या मूर्ती वापरणे चुकीचे आहे. मूर्ती ही पारंपरिक मातीचीच हवी. आमच्याकडे गणेश मूर्तीचा किमान दर रु. ८०० ते रु.४००० असा आहे.

कोरगाव, पेडणे येथील राजीव बर्वे लहानपणापासून गणेशमूर्ती बनवितात. ते म्हणाले, ७० चिकण मातीच्या मूर्ती बनविल्या आहेत. आणखी १०० मूर्ती तयार होतील. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे चिकण मातीपासून केलेल्याच मूर्तीचे पूजन करावे.

पर्यावरणाचा ऱ्हास होईल, अशा मूर्ती घेऊच नये. धारगळ येथील मूर्तीकार आबा टाळकर म्हणाले, हल्ली चिकण माती उपलब्ध होणेही अवघड झाले आहे.

तरीसुद्धा आवश्‍यक तेवढी माती मिळवून मूर्ती तयार केल्या आहेत. यंदा महागाईची झळ बसत आहे. इतर साहित्याचेही दर वाढले आहेत. त्यामुळे मूर्तीचे दर वाढणार आहेत. आमच्याकडे २५०० ते रू.६००० पर्यंत मूर्तीचे दर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS 1st T20: ऑस्ट्रेलियात 'सूर्य' तळपणार, कांगारुंना करणार सळो की पळो, हिटमॅन-किंग कोहलीचा 'तो' रेकॉर्ड निशाण्यावर?

भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर 'नापाक डोळा'! बांगलादेशात दाखवले आसाम-अरुणाचल; मोहम्मद युनुस यांच्या नकाशा भेटीवरुन नवा वाद

SIR In Goa: विधानसभा निवडणुकीपूर्वी तयारी! दुसऱ्या टप्प्यात गोव्यात होणार 'एसआयआर'; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Women's World Cup 2025: भारतीय महिला संघाला मोठा धक्का! सलामीवीर प्रतीका रावल विश्वचषकातून बाहेर

Goa electricity tariff hike: आठवड्यात दरवाढ मागे घ्या, अन्यथा...; काँग्रेस - आप शिष्टमंडळाची वीज खात्यावर धडक, आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT