Ganesh Chaturthi 2023: अभिमानास्पद! मूर्ती कलेत आता महिलाही सक्रिय, चित्रशाळांमधून मूर्ती घडविण्याची लगबग सुरू

वाढत्या महागाईमुळे यंदा गणपतीच्या मूर्तीचे दर किंचित वाढण्याचे संकेत आहेत.
Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Ganesh Chaturthi 2023 तमाम गणेशभक्तांना आता गणेश चतुर्थीचे वेध लागले असून, सध्या डिचोलीतील विविध भागातील चित्रशाळांमधून गणपतीच्या मूर्ती घडविण्याची लगबग सुरू झाली आहे. मूर्तीकारांचे हात कामाला लागले आहेत. विविध चित्रशाळांमधून रात्री जागून गणपतीच्या मूर्ती आकारही घेऊ लागल्या आहेत.

चिकण माती चित्रशाळेपर्यंत पोचविण्याचा खर्च आणि वाढत्या महागाईमुळे यंदा गणपतीच्या मूर्तीचे दर किंचित वाढण्याचे संकेत आहेत. तरीदेखील राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे आक्रमण ही मूर्तीकारांसाठी चिंतेची बाब बनली आहे.

बालगोपाळांचा आनंद द्विगुणित करणाऱ्या आणि हिंदूंचा मोठा धार्मिक सण असलेल्या चतुर्थीचे गणेश चतुर्थी यंदा सप्टेंबर महिन्याच्या १९ तारखेला साजरी होणार आहे.

Ganesh Chaturthi 2023
Cyber Crime In Goa: साडेचार वर्षांत तब्बल 159 सायबर गुन्हे; कोट्यवधींचा गंडा

डिचोलीतील काही चित्रशाळांमधून मूर्तीकार मूर्ती कामांसाठी आपल्या कुटुंबातील सदस्यांची मदत घेत आहेत. या कामात महिलांही आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. कुंभारवाडा-मये येथील एक मूर्तीकार कालिदास शेट यांना तर मुलां-बाळांसह त्यांची सहचारिणी करुणा शेट मूर्तीकामात मदत करीत आहेत.

काही चित्रशाळांमधून राज्याबाहेरील कुशल कारागिरांची मदत घेण्यात येते. यंदाही बहुतेक चित्रशाळांमध्ये राज्याबाहेरील कारागीर उपलब्ध झाले आहेत. कारागिरांच्या मदतीने काही चित्रशाळांमधून दिवसरात्र गणेशमूर्ती बनविण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे.

Ganesh Chaturthi 2023
Goa Education Loan: राज्यातील 36 विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी व्याजमुक्त कर्ज

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती नको!

बंदी असताना आणि स्थानिक मूर्तीकारांचा विरोध असतानाही गेल्या काही वर्षांपासून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीनी राज्यात आक्रमण केले आहे. शाडू मातीच्या मूर्ती असल्याचे सांगून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची विक्री होत असते.

या मूर्ती दिसायला सुबक आणि वजनाने हलक्या असल्याने काही गणेशभक्त या मूर्तीना पसंती देतात. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे स्थानिक मूर्तीकारांच्या व्यवसायाला फटका बसत आहे, अशी खंत रमाकांत शेटकर (डिचोली), सज्जन गावकर (कारापूर) आणि कालिदास शेट (मये) या मूर्तिकारांनी व्यक्त केली.

Ganesh Chaturthi 2023
Banastarim Bridge Accident: बाणास्तरी अपघातातील मर्सिडीजच्या चालकाला अटक

चित्रशाळेत लगबग

शंभरहून अधिक चित्रशाळा असून, मये गावात सर्वाधिक चित्रशाळा आहेत. चतुर्थीला साधारण सव्वा महिना राहिल्याने डिचोलीत विविध भागातील चित्रशाळांमधून मूर्तीकारांच्या हातांनी वेग घेतला आहे.

गणपतीच्या मूर्तीही आकार घेऊ लागल्या आहेत. डिचोलीसह, मये, कारापूर आदी भागातील चित्रशाळांमधून सध्या गणपती बनविण्याचे काम सुरू आहे. पुढील दहा-बारा दिवसांनी या कामाला जोर येण्याचे संकेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com