Goa: Tree Fallen at Galajibagh Beach Cancona. Dainik Gomantak
गोवा

Goa: गालजीबाग किनाऱ्याची प्रचंड झीज

Goa: लाटांच्या माऱ्याने किनाऱ्यावरील सुमारे ६० सुरूचे वृक्ष (Tree Fallen) उन्मळून पडले आहेत.

Mahesh Karpe

काणकोण : गालजीबाग समुद्र किनाऱ्याची (Galajibag Beach, Cancona-Goa) प्रचंड झीज झाली आहे. लाटांच्या माऱ्याने किनाऱ्यावरील सुमारे ६० सुरूचे वृक्ष उन्मळून पडले आहेत. समुद्राचे पाणी सुमारे दहा मीटर आत शिरले आहे. त्‍यामुळे सुमारे आठ घरांना धोका निर्माण झाला आहे. गालजीबाग किनाऱ्यावर असलेल्या जीवरक्षकांच्‍या टेहळणी कक्षाच्या पायाकडील वाळूची झीज झाल्याने हा कक्ष कोसळण्याचा धोका होता. त्यामुळे या कक्षाला रेतीच्या पिशव्या रचून संरक्षण देण्यात आले आहे. हा कक्ष भरती रेषेपासून सुमारे दोन मीटर अंतरावर आहे. हा किनारा सागरी कासवांसाठी (Sea Turtle) संरक्षित करण्यात आला आहे. सुमारे १ लाख ६० हजार १२१ मीटर जमीन कासव संवर्धन प्रकल्पासाठी ताब्यात घेतली आहे. तौक्ते वादळामुळे (Tauktae Cyclone) दोन कासवांची घरटी उद्‍ध्वस्त होऊन वाहून गेली होती. किनाऱ्याची झीज रोखण्यासाठी ५० वर्षांपूर्वी सुरूच्या झाडांची लागवड करण्यात आली होती, मात्र त्यानंतर वनखात्याने कोणतीच लागवड किंवा किनाऱ्याची झीज रोखण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, असे येथील नागरिकांचे म्‍हणणे आहे. तौक्ते वादळात गालजीबाग नदी किनारा फोडून अन्य मार्गाने समुद्राला मिळाली आहे. त्यावेळी या बांधावरील सुरूची काही झाडे उन्मळून पडली होती.

येथील स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात केव्हाच गालजीबाग किनाऱ्याची झीज झाली नाही. सुमारे दोन किलोमीटर लांबीच्या या किनाऱ्यावर सुरूच्या झाडांचे आच्छादन होते, ते हळूहळू नष्ट होत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना धोका आहे. किनाऱ्याची झीज होऊन सुमारे दोन मीटर भिंत तयार झाली आहे.

मोठ्या उपाययोजनांची गरज

गालजीबाग समुद्र किनारा सध्‍या असुरक्षित बनला आहे, असेच सध्‍याची परिस्थिती पाहता म्हणावे लागेल, असे क्षेत्रीय वनाधिकारी अनंत वेळीप यांनी सांगितले. प्रथम या किनाऱ्याला तौक्ते वादळाचा तडाखा बसून गालजीबाग नदीने आपले मुख बदलले. आता मुसळधार पावसामुळे प्रचंड लाटांनी ६० सुरूचे वृक्ष उन्मळून पडले आहेत. समुद्राचे पाणी जमिनीत घुसत आहे. भविष्यकाळात या किनाऱ्याची झीज रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्याची गरज आहे. किनाऱ्याची झीज रोखण्यासाठी वृक्षांचे आच्छादन केले होते, परंतु आता ते सुरूचे वृक्षच उन्मळून पडू लागले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड मोहीम राबवण्याची गरज निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. गालजीबाग किनाऱ्याची झीज झाल्‍याने येथील रहिवाशांच्या घरवई श्रद्धास्थानालाही धोका निर्माण झाला आहे. किनाऱ्याची झीज अशीच सुरू राहिल्यास हे श्रद्धास्थान कोसळण्याची भीती आहे.

‘तौक्‍ते’च्‍या प्रभावामुळे किनाऱ्याला बाधा

तौक्ते वादळाच्या प्रभावामुळे येथील किनाऱ्याला बाधा पोचली होती. सुरूच्‍या वृक्षांची मुळे उघडी पडल्याने आता पावसाळ्यात प्रचंड लाटांच्या माऱ्याने वृक्ष उन्मळून पडू लागले आहेत. किनाऱ्यावरील वाळू सैल झाल्याने समुद्र झपाट्याने जमीन गिळंकृत करू लागला आहे, हे धोकादायक आहे. येथील घरांनाही त्याचा धोका जाणवू शकतो. त्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे, असे मत गेली तीन वर्षे या किनाऱ्याचा अभ्यास करणारे श्री मल्लिकार्जुन आणि चेतन मंजू देसाई महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एफ.एम. नदाफ यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT