

वास्को: भारतीय किनाऱ्यापासून सुमारे १५०० किमी पश्चिमेला एका गंभीर जखमी इराणी मच्छीमारावर वैद्यकीय स्थलांतराच्या विनंतीला भारतीय तटरक्षक दलाने त्वरित प्रतिसाद दिला. इराणी मासेमारी धो अल-ओवैस जहाजावर इंधन हस्तांतरणादरम्यान झालेल्या स्फोटामुळे त्या मच्छीमाराला दोन्ही डोळ्यांना गंभीर दुखापत झाली होती आणि त्याच्या उजव्या कानाला खोल जखम झाली होती.
ही कारवाई २८ ऑक्टोबर रोजी सुरू झाली, ज्यामध्ये चाबहारने मुंबईला इराणी धो अल-ओवैस जहाजावरील वैद्यकीय आणीबाणीची माहिती दिली. सहा सदस्यांच्या क्रू जहाजाला खोल समुद्रात इंजिन बिघाड झाला. जवळच्या सर्व जहाजांना सतर्क करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सुरक्षा जाळे सक्रिय केल्यानंतर, एमआरसीसी मुंबईने एमटीएसटीआय ग्रेस वळवले.
समांतर आयसीजी जहाज साचेत जे पूर्व आफ्रिकन देशांमध्ये तैनात करून परतत होते, त्यांनादेखील त्वरित मदत देण्यासाठी वळवले. एमटीएसटी ग्रेस इराणी धोच्या जवळ असल्याने, रुग्णाला आयसीजी टेलिमेडिसिन सपोर्टसह प्रारंभिक वैद्यकीय मदतीसाठी जहाजावर नेले.
२९ ऑक्टोबर रोजी रात्री रुग्णाची वैद्यकीय स्थिती बिघडल्याने, भारतीय नौदलाच्या मदतीने रुग्णाला आयसीजी जहाजातून विमानाने हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. दुपारी १२ वाजता भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टर जखमी इराणी नागरिकासह उतरले. नंतर रुग्णाला गोमेकॉत हलवण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.