

Top Honeymoon Destinations For Indian Couples
भारतात पुन्हा एकदा लग्नाचा हंगाम रंगात आला आहे, आणि नवविवाहित जोडपी आपल्या “पहिल्या सुट्टीसाठी” सर्वोत्कृष्ट हनिमून डेस्टिनेशन शोधण्यात व्यस्त आहेत. २०२५ च्या ट्रॅव्हल ट्रेंडनुसार, भारतीय जोडप्यांमध्ये उष्णकटिबंधीय किनारे, सांस्कृतिक शहरं आणि लक्झरी अनुभवांचे मिश्रण सर्वाधिक लोकप्रिय ठरत आहे.
गोवा आणि दुबईसारखे कालातीत आवडते हनिमून हॉटस्पॉट्स पुन्हा अव्वल स्थानी आहेत, पण यंदा एक नवीन आश्चर्यकारक नाव झळकले आहे. व्हिएतनाममधील फु क्वोक बेट, जे २०२५ मधील भारतीय हनिमूनर्ससाठी सर्वाधिक शोधले जाणारे ठिकाण ठरत आहे.
सूर्यकिरणांनी उजळलेले समुद्रकिनारे, बुटीक रिसॉर्ट्स, आणि मेणबत्तीच्या प्रकाशात जेवण… गोवा अजूनही प्रेमकथांसाठी भारताचे हॉट फेव्हरेट ठिकाण आहे. बागा ते पालोलेमपर्यंत रोमँटिक फिरणं, मांडोवी नदीवरील सूर्यास्त क्रूझ किंवा दक्षिण गोव्याच्या लक्झरी रिसॉर्ट्समध्ये मुक्काम, हे सर्व नवविवाहित जोडप्यांसाठी स्वप्नवत अनुभव देतात.
“तलावांचे शहर” म्हणून प्रसिद्ध उदयपूर हे शाही अनुभवासाठी आदर्श ठिकाण आहे. ताज लेक पॅलेसपासून पिचोला तलावातील क्रूझपर्यंत, येथे प्रत्येक क्षणात राजेशाही आणि प्रेमाचे मिश्रण आहे. अरावली टेकड्यांमागे मावळणारा सूर्य आणि पारंपरिक वास्तुकला हा अनुभव अविस्मरणीय बनवतात.
ग्लॅमर, शॉपिंग, आणि रोमँटिक समुद्रकिनारे असल्याने मुंबई नवविवाहितांसाठी आधुनिक आणि उत्साही गंतव्य ठरत आहे. मरीन ड्राइव्हवरील सागरी हॉटेल्स, खाजगी नौका राईड्स आणि अरबी समुद्रावरील डिनर हे लक्झरी आणि रोमान्स दोन्ही देतात.
राजवाड्यांची भव्यता आणि लोकसंगीताच्या पार्श्वभूमीवर ताऱ्यांखालील जेवण करायचा आनंद घेता येतो. जयपूरची आकर्षणता हनिमूनसाठी परिपूर्ण ठरते. पुनर्संचयित हेरिटेज हॉटेल्समध्ये राहणं हा अनुभव ‘रॉयल’ प्रेमकथेला योग्य न्याय देतो.
हॅवलॉकच्या राधानगर बीचपासून नील बेटाच्या कोरल रीफपर्यंत, अंदमान भारतीय हनिमूनर्ससाठी स्वर्गासारखा अनुभव देत आहे. स्कूबा डायव्हिंग, सूर्यास्त कायाकिंग आणि निसर्गरम्य एकांत हा समुद्रकिनाऱ्यावरील प्रेमकथांचा सर्वोत्तम मंच आहे.
दुबई अजूनही भारतीय जोडप्यांचा पहिला परदेशी पर्याय आहे. बुर्ज खलिफाकडे पाहत रोमँटिक डिनर, वाळवंटातील हॉट एअर बलून राईड्स आणि जागतिक दर्जाची हॉटेल्स आहेत त्यामुळे दुबई म्हणजे ग्लॅमर आणि साहसाचं मिश्रण.
खाजगी पूल व्हिला, बीच क्लब आणि थाई मसाज — फुकेत नवविवाहितांसाठी शांत पण रोमँटिक सुटकेचं ठिकाण आहे. फी फी बेटांची बोट राईड आणि सूर्यास्ताचे क्षण हनिमूनचा हायलाइट ठरतात.
बँकॉकमध्ये जोडप्यांना दोन्ही अनुभव मिळतात. मंदिरे आणि आधुनिक स्काय डाइनिंगचा आनंद येथे घेता येतो. परवडणारे खर्च आणि सहज पोहोचण्याजोगं लोकेशन यामुळे ते लोकप्रिय ठरत आहे.
उबुडचे हिरवे टेरेस, सेमिन्याकचे समुद्रकिनारे आणि थंड वातावरणाचा आनंद येथे घेता येतो. बाली हे शांततेत आणि आत्मीयतेत वेळ घालवू इच्छिणाऱ्यांसाठी सर्वोत्तम आहे.
तरुण जोडप्यांसाठी पटाया म्हणजे फन आणि रोमँसचा परिपूर्ण कॉम्बो आहे. नाईटलाइफ, बीच अॅक्टिव्हिटीज आणि बेटांवरील अॅडव्हेंचर यामुळे हे ठिकाण तरुणांमध्ये लोकप्रिय आहे.
२०२५ मध्ये सर्वात मोठं आश्चर्य ठरलेलं ठिकाण म्हणजे फु क्वोक बेट. भारतीय पर्यटकांमध्ये याच्या शोधात तब्बल ७००% वाढ झाली आहे. सुलभ व्हिसा, सुंदर समुद्रकिनारे, आणि शांत वातावरण येथे असते. गर्दीशिवाय रोमँटिक सुटकेसाठी हे सर्वोत्तम ठिकाण ठरत आहे.
फु क्वोक म्हणजे मालदीवच्या लक्झरीला आग्नेय आशियाच्या परवडणाऱ्या किंमतीत मिळवण्याचा अनुभव.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.