G20 Summit Dainik Gomantak
गोवा

G20 Summit 2023: ऊर्जा संक्रमणाला गती देण्यासाठी ‘आयईए’चे प्रयत्न

‘जी २०’ च्या बैठकीत करार: डॉ.सुलतान अल जबर यांची माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

G20 Summit 2023: ‘कॉप२८’ यूएई प्रेसिडेन्सी आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था (आयईए) यांनी १.५ सेल्सिअस अंश संरेखित ऊर्जा संक्रमण तयार करण्यासाठी ‘कॉप २८’ पर्यंत उच्च-स्तरीय संवादांची बैठक मालिका सुरू झाली असून भारताच्या दृष्टीने हा मोठा गुंतवणूक मार्ग असेल,असे सांगण्यात आले.

आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा संस्था (आयआरईएनए) यांच्या संयुक्त विद्यमाने ही बैठक मालिका आयोजित केली जात आहे.

त्याला संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल संशोधनाद्वारे (यूएनएफसीसीसी) पाठबळ दिले जाईल,असे ‘कॉप२८’चे नियुक्त अध्यक्ष डॉ.सुलतान अल जबर यांनी सांगितले.

जबर म्हणाले ‘कॉप२८’ हे जगासाठी एकत्र येण्याची, निर्णायक कृतीसाठी एकत्र येण्याची, तत्कालीन पॅरिस कराराची उद्दिष्टे जिवंत ठेवण्यासाठी आणि १.५ सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याच्या दिशेने प्रगती करण्यासाठी एक मैलाचा दगड ठरणाऱ्या संधीचे प्रतिनिधित्व करते.

आयईएचे सर्वसमावेशक पॅकेज

‘आयईएने एक सर्वसमावेशक ऊर्जा पॅकेज पुढे केले आहे जे ‘कॉप२८’ यशस्वी होण्यास मदत करू शकते.

यामध्ये जागतिक नवीकरणक्षमतेची क्षमता तिप्पट करणे, ऊर्जा कार्यक्षमतेची प्रगती दुप्पट करणे, तेल आणि वायू उद्योगातील उत्सर्जन कमी करणे, विकसनशील अर्थव्यवस्थांसाठी स्वच्छ ऊर्जा वित्तपुरवठा वाढवणे, जीवाश्म इंधनाची मागणी तीव्रपणे कमी करणे यांचा समावेश आहे,असे आयईएचे कार्यकारी संचालक डॉ. फातिह बिरोल यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

तवडकरांना मिळाली गावडेंकडे असलेली सर्व खाती, 'आदिवासी कल्याण'ही पाहणार; कामतांकडे PWD, आणखी 2 मंत्र्यांना मिळाली 2 खाती

Bicholim: डिचोलीत झाली 4 टन फुलांची विक्री, भाव वाढल्याने विक्रेते आनंदी; चतुर्थीच्या पूर्वदिनी 'अच्छे दिन'

Goa Live Updates: जम्मू परिसरात दिवसात 380 मिमी पाऊस

Modak Significance: गणरायाला का प्रिय आहे मोदक? काय सांगते पुराण? वाचा महत्व..

Ganesh Festival: बौद्ध-जैन धर्मीयांनाही मान्य असलेले दैवत, गणपतीबाप्पाचे सर्वधर्मीय आकर्षण

SCROLL FOR NEXT