G-20 Summit  Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: स्वच्छ ऊर्जा रोडमॅप 2050’ लाँच; 2050 पर्यंत राज्य सौरऊर्जेचा 100 टक्के वापर करणार

मुख्यमंत्री : हरित पर्यटनाला राज्यात भरपूर वाव; स्वच्छ ऊर्जानिर्मितीसाठी सौरधोरण

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant: राज्यात २०५० पर्यंत सर्वच क्षेत्रांमध्ये अक्षय ऊर्जेचा वापर होईल. त्यासाठी लक्ष्य सुनिश्चित केले असून राज्य सरकारच्या वतीने प्रयत्न केले जात असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिली.

जी-२० ऊर्जा मंत्र्यांच्या कार्यगटाच्या बैठकीत ‘मिशन इनोव्हेशन’अंतर्गत गोव्याचा ‘स्वच्छ ऊर्जा रोडमॅप २०५०’ लाँच करताना ते बोलत होते. यावेळी केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंग, गोव्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर, मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल यांच्यासह विविध देशांचे ऊर्जामंत्री, ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, गोवा राज्य सौरऊर्जेचा उत्तम वापर करण्याच्या मार्गावर आहे. राज्याचे सौरधोरण देशांतर्गत स्वच्छ ऊर्जा निर्मितीवर केंद्रित केले आहे. गोव्यात २०१९ पासून सौर ऊर्जानिर्मिती सातपट वाढली आहे.

गोव्याच्या ‘एनर्जी व्हिजन’अंतर्गत आणि स्वच्छ ऊर्जा रोडमॅपच्या विश्लेषणानुसार गोवा २०५० पर्यंत किंवा त्याही आधी १०० टक्के अक्षय ऊर्जा आधारित वीजपुरवठा करण्याचे लक्ष्य गाठू शकेल, असेही ते म्हणाले.

लोककेंद्रीत योजना राबवणार

वाहतूक, उद्योग, आरोग्य, कृषी, मत्स्य व्यवसाय, तसेच अन्न यांसारखी महत्त्वाची क्षेत्रे, स्वच्छ तंत्रज्ञान आणि शाश्वत पद्धतींचा जलद अवलंब सुनिश्चित करण्यासाठी जागरूकता मोहिमा आणि कौशल्य कार्यक्रमांसह, लोककेंद्रीत योजनांची मालिका राबवण्यासाठी सरकार सज्ज आहे.

स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान आणि या पद्धतींचे प्रायोगिक प्रात्यक्षिक, नाविन्यपूर्ण सेवा वितरण मॉडेल किंवा दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारीसाठी गोवा सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

गोव्यातील पर्यटनाला हरित पर्यटनात रूपांतरित करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठीचा धोरणात्मक रोडमॅप आधीच तयार आहे आणि आम्ही लवकरच या निसर्गाधारित उद्योगाला डिकार्बनाईज करण्यासाठी अक्षय ऊर्जेचा कसा वापर करता येईल, तसेच ऊर्जा कार्यक्षमतेच्या अनेक उपक्रमांसाठी ब्लू प्रिंट सादर करू.- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: आधी कौतुकाची थाप, मग दिला धक्का! डॅरिल मिचेलच्या शतकानंतर कोहलीने नेमकं काय केलं? पाहा व्हायरल व्हिडिओ

छ. संभाजी महाराजांनी सांत इस्तेव्हांव किल्ल्यावर हल्ला केला, पोर्तुगिजांना समजायच्या आत जुवे किल्ला घेतला; गोव्यावर औरंगजेबाची वक्रदृष्टी

Russian Tourist Murder: 'त्या' रशियन महिलांचा खून पैशासाठीच, राग आल्यावर 'आलेक्सेई' महिलांना टार्गेट करायचा; तपासात धक्कादायक माहिती समोर

Robbery Attempt: होंडा येथील नवनाथ मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न

Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वालचा पारा चढला? ध्रुव जुरेलच्या कानाखाली मारायला गेला, नक्की काय घडलं? Watch Video

SCROLL FOR NEXT