Goa G-20 Summit Dainik Gomantak
गोवा

Goa G-20 Summit : ‘जी-20’ स्वच्छ ऊर्जा, मिशन इनोव्हेशन बैठक गोव्‍यात सुरू

मंत्रिस्तरीय बैठक आज

गोमन्तक डिजिटल टीम

Goa G-20 Summit : जी-20 स्वच्छ ऊर्जा मंत्रिस्तरीय 14 व्या आणि मिशन इनोव्हेशनच्या आठव्या बैठकीला आज गोव्यात प्रारंभ झाला. त्‍यात 34 पेक्षा जास्त सदस्य देश सहभागी झाले आहेत. स्वच्छ ऊर्जाविषयक त्रिसदस्यीय मंत्रिगटाच्या इतर सदस्यांचे (अमेरिका आणि ब्राझिल) विशेष संबोधन, सीईएम आणि एमआयच्या सचिवांची भाषणे झाली.

‘स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने एकत्रितपणे आगेकूच’ ही या वर्षाची संकल्पना आहे. सीईएम बैठकीच्या पहिल्या दिवशी सीईएम कार्य समन्वयक, आंतरराष्ट्रीय संस्था, संशोधक, धोरणतज्‍ज्ञ, उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक आणि इतरांसह 800 पेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित आहेत.

या कार्यक्रमामध्ये 50 पेक्षा जास्त भागीदारांकडून 30 इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ऊर्जा कार्यक्षमता, स्वच्छ इंधने, स्वच्छ ऊर्जा, वाहने आणि उद्योगांमधील कार्बनमुक्ती अशा विविध संकल्पनांचा या उपकार्यक्रमांमध्ये समावेश होता.

मंत्रिस्तरीय बैठक आज

उद्या शुक्रवार दि. २१ जुलै रोजी मंत्रिस्तरीय बैठक होणार आहे तर 22 जुलैला एकापाठोपाठ एक अशा जी-20 ऊर्जा संक्रमण मंत्रिस्तरीय बैठका होणार आहेत.

या बैठकांसोबत इतर संवाद, चर्चा आणि प्रदर्शन कार्यक्रम होत आहेत. जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात स्वच्छ ऊर्जा संक्रमणामध्ये जागतिक सहकार्य मजबूत करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT