G-20 Beach Clean Campaign: जी-20 च्या मेगा बीच क्लीन अप मोहिमेचा भाग म्हणून आज कळंगुट आणि कोलवा किनाऱ्यांवर आयोजित करण्यात आलेल्या किनारे स्वच्छता मोहिमेमध्ये वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, नागरिक, जवान यांनी उस्फूर्त प्रतिसाद नोंदवत किनाऱ्यांची स्वच्छता केली.
ही मोहीम जी-20 देशांच्या, तसेच देशभरातील 37 ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. यावेळी आपले महासागर स्वच्छ आणि निरोगी ठेवण्याची शपथ घेतली.
भारताच्या जी-20 अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या मेगा बीच क्लीन अप मोहिमेत जी-20 देश, निमंत्रित देश, राज्य सरकारी अधिकारी, आंतरराष्ट्रीय संस्था आणि तिसऱ्या बैठकीला उपस्थित असलेले प्रतिनिधी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.
आणि किनारपट्टी भागातील आणि सागरी परिसंस्था जतन करण्याच्या जागतिक वचनबद्धतेवर त्यांनी भर दिला.
सागरी कचऱ्याच्या पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि समुद्री जनजागृती करणे, तसेच ते रोखण्यासाठी कृती करायला लोकांना प्रोत्साहन देणे, हे या मेगा बीच क्लीन अप मोहिमेचे उद्दिष्ट होते. हे पर्यावरणीय आव्हान थोपवण्यासाठी वैयक्तिक प्रयत्न आणि समुदायाच्या सहभागाचे महत्त्व या कार्यक्रमाद्वारे अधोरेखित करण्यात आले.
देशभरात 13 किनारी राज्ये आणि 9 केंद्रशासित प्रदेशांमध्ये समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता उपक्रम आयोजित करण्यात आले होती. समुद्रकिनाऱ्यावरील सेल्फी पॉइंट हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते.
20 देशांचा सहभाग
या उपक्रमात जगभरातील 20 देशांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, इंडोनेशिया, जपान, मेक्सिको, कोरिया, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे 14 देश, आणि इजिप्त, मॉरिशस, नेदरलँड, नायजेरिया, ओमान आणि सिंगापूर हे 6 निमंत्रित देश या कार्यक्रमात सहभागी झाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.