Tourist In goa For new Year Dainik Gomantak
गोवा

Happy New Year 2023: नववर्षाच्या स्वागतासाठी देश-विदेशातील पर्यटकांनी गोवा 'फुल्ल'

वाहतुकीची कोंडीमुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला

Rajat Sawant

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे जंगी स्वागत करण्यासाठी अभिनेते, उद्योजक, राजकीय अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील महनीय व्यक्तींबरोबरच देश-विदेशातील पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. राज्यात नववर्षाच्या स्वागताची पर्यटकांची धूम आज संध्याकाळ पासूनच सुरु झाली होती. समुद्र किनाऱ्यावऱ्यांवरी शॅकमध्ये दुपारपासूनच गर्दी होती. वाद्यांच्या दणदणाटाने किनारपट्टी गजबजून गेली आहे.

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक सेलिब्रिटी गोव्यात दाखल झाले आहेत, तर काही सेलिब्रिटी हे विशेष कार्यक्रमांनिमित्त आधीच दाखल झाले आहेत. याशिवाय राजकीय मंडळीही गोव्यात दाखल झाली आहे. मात्र, त्यांचे हे खासगी दौरे असल्याने त्याविषयी गुप्तता बाळगण्यात आली असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. केंद्रीय मंत्री पीयुष गोएल हे सहकुटुंब गोव्यात नववर्ष स्वागतासाठी यापूर्वीच दाखल झाले आहे.

प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार व त्याची पत्नी ट्विंकल खन्ना, सिने तारका अमिषा पटेल, गोव्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी विनोदी अभिनेते सतीश कौशिक हेही नूतन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात आले आहेत. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन हा गोवा रणजी संघाकडून खेळत असल्याने त्याचा मुक्काम गोव्यातच आहे. त्यांची मुलगी सारा तेंडुलकर ही गोव्यात दाखल झाली आहे. शनिवारी रात्री गायक हिमेश रेशमिया, आकसा, बॉम्बे विकिंग्स, विकल्प मेहता यांच्यासह सपना चौधरी यासारख्या नृत्यांगणांचे कार्यक्रम काही कॅसिनोंमध्ये झाले.

शेजारील महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांतून अनेक वाहने गोव्यात दाखल झाली आहेत व होत आहेत. तसेच राज्यात काही ठिकाणी रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने स्थानिक तसेत पर्यटकांना वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. किनारी भागातील रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात दिसुन येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: बाहेरच्या लोकांमुळे 'सुशेगाद' गोव्याची शांतता भंग! गोमंतकीयांना RG-गोवा फॉरवर्डच्या युतीत दिसतोय 'आशेचा किरण'

Senior T20 cricket: गोव्याच्या महिलांची विजयी सलामी, सीनियर टी-20 क्रिकेट स्पर्धेत उत्तराखंडला 13 धावांनी नमविले

Goa Politics: खरी कुजबुज, मिकीचा 'सोशल ॲक्‍टिविस्‍ट'शी पंगा

सिलिंग फॅन तुटून विद्यार्थीनीच्या अंगावर पडला, पर्ये – सत्तरी सरकारी शाळेतील चौथीची विद्यार्थीनी जखमी

Goa Live News: गांजा बाळगल्याप्रकरणी मडगाव पोलिसांकडून दोघांना अटक

SCROLL FOR NEXT