Online Fraud in Goa : राज्यात ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये वाढ; पर्वरी येथील डॉक्टरला 2 लाखांचा गंडा

मिलिटरी ऑफिसर असल्याचे भासवत केली फसवणुक
Online Fraud
Online Fraud Dainik Gomantak
Published on
Updated on

एका डॉक्टराला 2 लाख 85 हजारांचा ऑनलाइन गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पर्वरी हाऊसिंग बोर्ड येथील डॉक्टरसोबत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. अकांऊट मधून पैसे गायब होताच डॉक्टरांना हा प्रकार लक्षात आला. याबाबतची तक्रार शुक्रवारी रात्री पर्वरी पोलीस स्टेशन मध्ये नोंदविण्यात आली.

Online Fraud
Mohan Bhagwat : RSS च्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी भागवत सोमवारपासून गोव्यात

याबाबत अधिक माहिती अशी की, १९ ऑगस्ट रोजी दुपारी साडेअकरा वाजता एका अज्ञात मोबाईल क्रमांकारून पर्वरी हाऊसिंग बोर्ड येथील महिला डॉक्टरला फोन आला. यावेळी त्या व्यक्तिने आपण मिलिटरी ऑफिसर असल्याचे सांगितले. काही सैनिकांना दाताची ट्रीटमेंट तुमच्याकडून करायची आहे. त्याच्यासाठी तुमचे बँकेचे तपशील द्या असे सांगितले. डॉक्टरांनी बँकेचे तपशील दिल्यानंतर सदर अज्ञात इसमाने एक लिंक डॉक्टरांना पाठवली. ती लिंक क्लिक करा असे सांगण्यात आले. लिंकवर क्लिक करताच त्यांच्या खात्यातून २ लाख ८५ हजार रुपये गायब झाले.

Online Fraud
Margao : मडगाव बसस्थानकात पर्यटक, कदंब कर्मचाऱ्यांमध्ये खडाजंगी

पैसे गायब होताच डॉक्टरांनी बँकेच्या संबंधित नंबरवर फोन केला व दुसऱ्या दिवशी कार्यालयात जाऊन तक्रार दिली."आम्ही कारवाई करतो", असे आश्वासनही बँकेकडून मिळाले होते. परंतु उशीरापर्यंत बँकेकडून योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे डॉक्टरांनी पर्वरी पोलीस स्टेशन गाठले व तक्रार दिली. डॉक्टरांच्या लेखी तक्रारीवर पर्वरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रतीक भट प्रभू पुढील चौकशी करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com