Goa Fuel Leak Issue Dainik Gomantak
गोवा

Goa Fuel Leak Issue: अखेर ZOIL विरुद्ध पंतप्रधान कार्यालयात तक्रार दाखल

Goa Fuel Leak Issue: दाबोळी इंधन गळती प्रकरण: स्थानिकांचा आक्रमक

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Fuel Leak Issue: दाबोळी माटवे व्हडले भाट परिसरात अजूनही पेट्रोल डिझेल मिसळीत इंधनाचा साठा विहिरीत नाल्यात मिळत आहे.

25 दिवस उलटून गेले अजूनही संबंधीत सरकारी किंवा जुआरी इंडियन ऑईल अदानी वेन्चर लिमिटेडने उपाय योजना केली नसल्याने पंच निलम नाईक यांनी कंपनी व संबंधीत विरोधात पंतप्रधान कार्यालय, पेट्रोलियम मंत्रालयात तक्रार दाखल केली आहे.

सोमवारी जु इं ऑ अ वे विरुद्ध न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार करणार अशी माहिती पंच निलम नाईक यांनी दिली आहे.

व्हडलेभाट, चिखली-दाबोळी परिसरात झुआरी इंडियन ऑईल भूमिगत इंधनवाहिनी गळती प्रकरण गेल्या काही दिवसांपासून गाजतेय.

साधारण आठ दिवसांपूर्वी आल्त-दाबोळी येथील वालिस जंक्शनसमोरील इंधनवाहिनीला भेगा पडल्यामुळे इंधन गळती होत असल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीप्रसाद नाईक यांनी दिली होती.

मात्र परिसरातील रहिवाश्यांना इंधन गळतीचा त्रास अजूनही सहन करावा लागतोय. सध्या भागातील लोक स्वयंपाकासाठीही बाहेरून पाणी आणत आहेत.

या पेट्रोलियम गळती विरोधात माटवे, दाबोळीच्या पंच नीलम नाईक आणि स्थानिकांनी एक दिवसीय निषेध दर्शवला असून ZOIL गळतीचे खरे कारण लपवून किरकोळ गळती दाखवत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

मात्र संबंधित कंपनीकडून आवश्यक त्या उपाय योजना होत नसल्याने आता ,पंच नाईक यांनी कंपनी व संबंधीत विरोधात तक्रार दाखल केली आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT